U-19 World Cup: यश धुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार

हरनूर सिंग, राजवर्धन हंगरगेकर, कर्णधार यश धुल (Yash Dhul) आणि रवी कुमार यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जातेय, ज्यांनी आतापर्यंत मागील स्पर्धांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

U-19 World Cup मध्ये चार वेळा चॅम्पियन असलेली टीम इंडिया पहिल्या सामन्यात शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना आपला विक्रम अबाधित ठेवत नवीन प्रतिभा शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. हरनूर सिंग, राजवर्धन हंगरगेकर, कर्णधार यश धुल (Yash Dhul) आणि रवी कुमार यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जातेय, ज्यांनी आतापर्यंत मागील स्पर्धांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे.

दरम्यान, आशिया चषक जिंकून आणि सराव सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन भारतीय संघ इथं दाखल झाला आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेला भारतीय संघ (Team India) गेल्या तीन हंगामात अंतिम फेरीत पोहोचला आहे. दोन वर्षांपूर्वी बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) अंतिम फेरीत पराभूत झालेल्या भारतीय संघातील एकाही खेळाडूला वरिष्ठ संघात स्थान मिळालेले नाही. आता 2022 च्या 19 वर्षांखालील संघातील खेळाडू हा चमत्कार करु शकतात का हे पाहावं लागणार आहे. सध्याच्या संघात पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल (2018 बॅच) यांचा समावेश नाही. परंतु संघातील इतर खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले आहे.

Team India
U-19 World CUP 2022: टीम इंडिया पाचव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी सज्ज!

तसेच, गेल्या वेळी यशस्वी जैस्वालने या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. हरनूरने आशिया चषक स्पर्धेत पाच सामन्यांत 251 धावा केल्या आहेत. 11 जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात नाबाद शतक हरनूरने ठोकले. वेगवान गोलंदाज हंगरगेकरने आशिया चषक स्पर्धेत आपल्या वेगवान गोलंदाजीची छाप पाडली असून आठ विकेट्स घेतल्या. दुसरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार विकेट घेतल्या. कर्णधार धुलची गणना दिल्ली क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान फलंदाजांमध्ये केली जाते. आशिया चषक स्पर्धेत त्याला कोणतीही आश्चर्यकारक कामगिरी करता आली नाही, परंतु दोन्ही सराव सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली आहेत. अष्टपैलू राज बावा हा मध्यमगती गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज असून तो संघाचा अतिशय उपयुक्त सदस्य आहे.

शिवाय, मुख्य प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर म्हणाले, “या स्पर्धेत भारताचा गौरवशाली इतिहास आहे, परंतु ती भूतकाळातील गोष्ट आहे. नव्या संघासह नव्याने सुरुवात करायची आहे.''

Team India
U-19 Asia Cup 2021: टीम इंडिया बनली चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेचा उडवला धुव्वा

भारताला ब गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा सोबत ठेवण्यात आले आहे. अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा या गटातील सर्वात कठीण सामना असेल. दक्षिण आफ्रिकेने 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते परंतु दोन वर्षांपूर्वी उपांत्यपूर्व फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्याच्याकडे डेवाल्ड ब्रेव्हिससारखा अष्टपैलू खेळाडू आहे, त्याची तुलना एबी डिव्हिलियर्सशी केली जाते.

भारत : यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव पारख, कुशल तांबे, राजवर्धन हुंगरगेकर, विक्की वसुली, ओ. रवी कुमार, गरव सांगवान.

दक्षिण आफ्रिका : जॉर्जेस व्हॅन हेर्डन (कर्णधार), लियाम अल्डर, मॅथ्यू बोस्ट, डेवाल्ड ब्रेविस, मायकेल कोपलँड, एथन कनिंगहॅम, व्हॅलेंटाईन किटाईम, वेना माफाका, गेरहार्ड मेरी, फाइव्ही मायंडा, अँडीले सिमेलेन, जेड स्मिथ, केडेन सोलोमन्स, जोशुआ स्टीफनसन, असाखे ताशाका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com