U-19 World CUP 2022: टीम इंडिया पाचव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी सज्ज!

भारतीय अंडर-19 (U19 Team India) संघ शनिवारपासून विश्वचषक (U-19 World CUP 2022) मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
U-19 Team India
U-19 Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय अंडर-19 (U19 Team India) संघ शनिवारपासून विश्वचषक (U-19 World CUP 2022) मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. संघाला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेसारख्या (South Africa) बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. सामन्यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर (Hrishikesh Kanitkar) यांनी स्पर्धेतील आपल्या रणनीतीबद्दल बोलताना सांगितले की, 'विश्वचषकादरम्यान आमचा संघ छोटी छोटी उद्दिष्टे निश्चित करेल आणि त्यावर काम करेल. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत (U-19 World CUP) भारताला समृद्ध वारसा मिळाला असून तो पुढे चालू ठेवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु.'

दरम्यान, वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) शुक्रवारपासून अंडर-19 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. भारत हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने (Team India) 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर गेल्या तीन वेळा अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले आहे. गतवेळी संघाला अंतिम फेरीत बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, यावेळी तो पुन्हा चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज झाला आहे.

U-19 Team India
U19 World Cup: 46 धावांत ऑलआऊट...टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वीच 'हा' संघ ढेर

संघ नव्याने सुरुवात करेल

पत्रकारांशी संवाद साधताना प्रशिक्षक कानिटकर म्हणाले, 'भारताने या स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे संघाचा स्पर्धा जिंकण्याचा वारसा राहिलेला आहे. नवीन टूर्नामेंटमध्ये त्याचा फायदा होत नाही परंतु आम्ही चार वेळा चॅम्पियन झालो आहोत. ही एक नवीन टीम आहे, त्यामुळे तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. मात्र, सध्यातरी या स्पर्धेत आपण काय करु शकतो यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आम्ही, एक कोचिंग युनिट म्हणून काम करत आहोत.

बायो बबलची सवय लावणे आवश्यक

जैव-सुरक्षित वातावरणाच्या ( Bio-bubble) कठीण परिस्थितीत खेळण्याबद्दल विचारले असता, माजी भारतीय क्रिकेटपटू म्हणाले की, तक्रार करण्यापेक्षा त्याची सवय करणे चांगले आहे. ते पुढे म्हणाले, 'हो, हे आव्हान आहे. आता हीच आदर्श परिस्थिती असून हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्याची सवय करुन घेणे चांगले. हे आता वास्तव असून, बायो-बबलमध्ये जगणे, त्यातून शिकणे, या विश्वचषकानंतरही जेव्हा संघाला बबलमध्ये राहणे आवश्यक असेल तेव्हा ते जरुर राहतील.

अंडर-19 आशिया चषकातील विजयासह भारतीय संघाने अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत प्रवेश केला आहे. आशिया चषक स्पर्धेत संघाला एकत्र खेळण्याची संधी मिळाल्याने याचा फायदा संघाला होईल, असे मुख्य प्रशिक्षक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com