South Africa vs India, 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (21 डिसेंबर) खेळला गेला. पार्ल येथील बोलंड पार्क येथे दोन्ही संघ आमने-सामने आले होते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत आठ विकेट गमावत 296 धावा केल्या होत्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य दिले होते. अखेर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव केला.
दरम्यान, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने 78 धावांनी विजय मिळवला. यासह केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 ने पराभव केला.
दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी यावे लागले. भारताने 50 षटकांत आठ विकेट गमावत 296 धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 108 आणि तिलक वर्माने 52 धावा केल्या. सॅमसनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक तर तिलकने पहिले अर्धशतक झळकावले. दोन्ही खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली होती.
दुसरीकडे, रिंकू सिंहने 27 चेंडूत 38 धावा, पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या रजत पाटीदारने 16 चेंडूत 22 धावा आणि कर्णधार केएल राहुलने 35 चेंडूत 21 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 14 धावा करुन बाद झाला तर साई सुदर्शन 10 धावा करुन बाद झाला. अक्षर पटेलला एकच धाव काढता आली. अर्शदीप सिंग सात धावा करुन नाबाद राहिला आणि आवेश खान एक धाव काढून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरन हेंड्रिक्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गरला दोन विकेट्स मिळाल्या. लिझार्ड विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान, प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.5 षटकांत 218 धावाच करु शकला. संघाकडून टोनी डी जोर्जीने 87 चेंडूत 81 धावा केल्या. तर कर्णधार एडन मार्करमने 36 धावा केल्या. मात्र याशिवाय, एकाही फलंदाजाने म्हणावी तशी फलंदाजी केली नाही. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. विशेषत: वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांनी 2 बळी घेतले. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पहिली विकेट: रीझा हेंड्रिक्स (19), विकेट- अर्शदीप सिंग (59/1)
दुसरी विकेट: रॅसी व्हॅन डर डुसेन (2), विकेट- अक्षर पटेल (76/2)
तिसरी विकेट: एडन मार्करम (36), विकेट- वॉशिंग्टन सुंदर (141/3)
चौथी विकेट: टोनी डी जोर्जी (81), विकेट- अर्शदीप सिंग (161/4)
पाचवी विकेट: हेन्रिच क्लासेन (21), विकेट- आवेश खान (174/5)
सहावी विकेट: विआन मुल्डर (1), विकेट- वॉशिंग्टन सुंदर (177/6)
सातवी विकेट: डेव्हिड मिलर (10), विकेट- मुकेश कुमार (192/7)
आठवी विकेट: केशव महाराज (14), विकेट- अर्शदीप सिंग (210/8)
नववी विकेट: लिझाड विल्यम्स (2), विकेट- अर्शदीप सिंग (216/9)
पहिली विकेट: रजत पाटीदार (22), विकेट- नांद्रे बर्गर (34/1)
दुसरी विकेट: साई सुदर्शन (10), विकेट- ब्युरन हेंड्रिक्स (49/2)
तिसरी विकेट: केएल राहुल (21), विकेट- विआन मुल्डर (101/3)
चौथी विकेट: तिलक वर्मा (52), विकेट- केशव महाराज (२217/4)
पाचवी विकेट: संजू सॅमसन (108), विकेट- लिझार्ड विल्यम्स (246/5)
सहावी विकेट: अक्षर पटेल (1), विकेट- ब्युरन हेंड्रिक्स (255/6)
सातवी विकेट: वॉशिंग्टन सुंदर (14), विकेट- ब्युरन हेंड्रिक्स (277/7)
आठवी विकेट: रिंकू सिंह (38), विकेट- नांद्रे बर्गर (293/8)
तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत 108 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान संजूने 6 चौकार आणि 3 शानदार षटकार मारले. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिलेच शतक आहे. आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही संजूशी हस्तांदोलन करताना दिसले. आपल्या फलंदाजीदरम्यान संजूने केवळ भारतीय डाव सावरला नाही तर संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीत नेल्यानंतर तो बाद झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.