WI vs IND: टीम इंडिया खेळणार 200 वा T-20! पहिल्या मॅचमधील खेळाडू अन् निकाल काय होता, घ्या जाणून

Team India T20I Cricket: भारतीय संघ 3 ऑगस्टला वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहातील 200 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणार असून 17 वर्षांपूर्वी खेळलेल्या पहिल्या टी20 सामन्याबद्दल सर्वकाही जाणून घ्या.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Team India 200th T20I Cricket Match: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 ऑगस्ट म्हणजे आजपासून 5 सामन्यांची टी20 मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज त्रिनिदादमधील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघासाठी खूप खास असणार आहे.

हा सामना भारताचा 200 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना असणार आहे. भारत 200 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा पाकिस्ताननंतरचा दुसराच खेळाडू बनणार आहे. पाकिस्तानने 223 टी20 सामने खेळले आहेत.

दरम्यान, 17 वर्षात भारताने टी20 क्रिकेटमध्ये मोठा पल्ला गाठला आहे. भारताने आत्तापर्यंत खेळलेल्या 199 टी20 सामन्यांपैकी 127 सामने जिंकले आहेत. तसेच 63 पराभव स्विकारले आहेत. त्याचबरोबर 4 सामने बरोबरीत सुटले आहेत, तर 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

Team India
T20 World Cup 2024: टी20 वर्ल्डकपचा मुहूर्त ठरला? 20 संघात रंगणार थरार

पहिल्या सामन्यातील संघ

भारताने त्यांचा क्रिकेट इतिहासातील पहिला सामना 2006 साली 1 डिसेंबर रोजी खेळला होता. हा सामना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गला खेळला होता. त्या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्या सामन्यात भारताचे नेतृत्व विरेंद्र सेहवागने केले होते. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ होता.

त्या सामन्यात भारताकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, दिनेश मोंगिया, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, इरफान पठाण, हरभजन सिंग, झहीर खान, अजित अगरकर, एस श्रीसंत हे खेळाडू खेळले होते. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा एकमेव टी20 सामना खेळला.

तसेच दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ग्रॅमी स्मिथ, लूट्स बोस्मन, हर्षल गिब्स, जस्टीन केम्प, एबी डिविलियर्स, एल्बी मॉर्केल, जोहन वॅन डर वॅथ, रॉबिन पीटरसन, टायरन हेंडरसन, रॉजर टेलेमॅचस आणि चार्ल लँगवॉल्ट हे खेळाडू खेळले होते.

Team India
BCCI Chief Selector: शिक्कामोर्तब झालं! अजित आगरकर भारतीय संघाचा नवा 'चीफ सिलेक्टर'

पहिल्या सामन्याचा निकाल

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 126 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून एल्बी मॉर्केलने सर्वाधिक 27 धावा केल्या होत्या. तसेच जस्टीन केम्पने 22 आणि जोहन वॅन डर वॅथने 21 धावा केल्या होत्या.

भारताकडून झहीर आणि अगरकर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच एस श्रीसंत, सचिन आणि हरभजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

त्यानंतर 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून दिनेश मोंगियाने सर्वाधिक 38 धावा केल्या होत्या, तर सेहवागने 34 धावांची खेळी केली होती.

तसेच अखेरीस दिनेश कार्तिकने महत्त्वपूर्ण 31 धावांची नाबाद खेळी केली होती. 28 धावात केलेल्या या नाबाद खेळीत त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला होता. त्यामुळे भारताने 19.5 षटकात म्हणजेच एक चेंडू राखून आणि ६ विकेट्स राखून 127 धावांचे आव्हान पार करत सामना जिंकला होता. या सामन्यात दिनेश कार्तिकलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

दक्षिण आफ्रिकेकडून चार्ल लँगवॉल्टने 2 आणि रॉबिन पीटरसनने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com