T20 World Cup 2024: टी20 वर्ल्डकपचा मुहूर्त ठरला? 20 संघात रंगणार थरार

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत.
T20 World Cup
T20 World Cup Dainik Gomantak
Published on
Updated on

Men's T20 World Cup 2024 set to played in June next year in Caribbean and USA: आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा पुढीलवर्षी कॅरिबियन बेटांवर (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सामील होणार आहेत. दरम्यान या स्पर्धेच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी 4 जून ते 30 जून 2024 दरम्यान नववा टी20 वर्ल्डकप खेळवला जाण्याची शक्यता आहे. तसेच या स्पर्धेतील सामने 10 ठिकाणी होतील.

या आठवड्यात आयसीसी अमेरिकेतील शॉर्टलिस्ट केलेल्या ठिकाणांची पाहाणी करणार आहे. यापूर्वी अमेरिकेत फ्लोरिडा आणि लॉडरहिल येथे आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. पण यंदा मॉरिसविल, डेला आणि न्यूयॉर्कलाही सामने होऊ शकतात.

सध्या मॉरिसविल आणि डेला येथे मेजर क्रिकेट लीग स्पर्धेतील सामने खेळले जात आहेत. पण या तिन्ही ठिकाणांवरील मैदानांना अद्याप आंतरराष्ट्रीय मैदानांचा दर्जा मिळालेला नाही. याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही.

T20 World Cup
Suryakumar Yadav: T20 मध्ये सूर्याची बादशाहत कायम, ICC ने केली 'ही' मोठी घोषणा!

20 संघात होणार स्पर्धा

दरम्यान, टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होणार आहेत. सध्या या 20 संघांपैकी 15 संघांनी पात्रता मिळावली आहे.

टी20 वर्ल्डकप 2022 मधील पहिले 8 संघ म्हणजेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याबरोबरच टी20 क्रमवारीत पहिल्या 10 संघांमध्ये असेलल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना थेट पात्रता मिळाली आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे यजमान असल्याने त्यांनाही थेट पात्रता मिळाली आहे. याशिवाय पापुआ न्यू गिनी (PNG) संघाने इस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफिकेशनमधून पात्रता मिळवली आहे, तर आयर्लंड आणि स्कॉटलंड युरोप रिजन क्वालिफायरमधून पात्र ठरले आहेत.

आता अमेरिका क्वालिफायर, आफ्रिका क्वालिफायर आणि आशिया क्वालिफायरमधून आणखी ५ संघ पात्र ठरणार आहेत.

T20 World Cup
Women's T20 World Cup विजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळाले कोट्यवधी रुपये! टीम इंडियाला किती मिळाले पैसे, घ्या जाणून

असा खेळवला जाणार टी20 वर्ल्डकप

साल 2024 मधील टी20 वर्ल्डकप वेगळ्याप्रकारे खेळवला जाणार आहे. सहभागी 20 संघांची चार गटात विभागणी केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर 8 फेरीत प्रवेश करतील.

त्यानंतर सुपर 8 फेरीमध्ये पोहचणाऱ्या 8 संघांची दोन गटात विभागणी होईल. त्यानंतर दोन्ही गटातील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरी खेळतील. उपांत्य सामन्यांमध्ये विजयी होणारे संघ अंतिम सामना खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com