IND vs AUS, ODI Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (शुक्रवार) 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये केएल राहुल टीम इंडियाचा कर्णधार असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, टीम इंडियाचा एक धाकड ऑस्ट्रेलियन संघासाठी काळ बनू शकतो.
भारताला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळायचा असून हा सामना जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पहिल्या वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर ठरु शकतो.
मोहालीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते, अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूर मोहालीच्या खेळपट्टीवर आपला जलवा दाखवू शकतो.
शार्दुल आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्यात माहिर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार केएल राहुलने वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूरला संधी दिली, तर तो भारताला एकहाती सामना जिंकून देऊ शकतो.
दरम्यान, शार्दुल सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्ये विकेट घेण्यात माहिर आहे. शार्दुलच्या आगमनाने टीम इंडियाला (Team India) आणखी बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे, शार्दुलकडे वेगासह उत्कृष्ट स्विंग आहे, त्यामुळे तो फलंदाजांसाठी अत्यंत धोकादायक ठरु शकतो.
शार्दुल ठाकूरने टीम इंडियासाठी 42 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 28.56 च्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या सरासरीने 63 बळी घेतले आहेत. शार्दुलचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड आणखी चांगला आहे.
शार्दुलने टीम इंडियासाठी 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 23.39 च्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या सरासरीने 33 बळी घेतले आहेत. शार्दुल ठाकूर किलर गोलंदाजीसह विस्फोटक फलंदाजीतही पारंगत आहे, ज्यामुळे भारतीय संघाला मजबूत संतुलनही मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.