शोएब अख्तर लतादीदींना आई म्हणाला...

लता मंगेशकर म्हणाल्या की, बेटा तू मला आई म्हणून हाक मारलीस तर बरे होईल. तेव्हा मी लतादीदींना आई म्हणालो.
Shoaib Akhtar And Lata Didi
Shoaib Akhtar And Lata DidiDainik Gomantak
Published on
Updated on

रविवार 6 फेब्रुवारी हा दिवस भारतासाठी अतिशय दुःखाचा दिवस होता. आपल्या सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर या आता आपल्यात नाहीत. ही बातमी कळताच जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सांगितले की, जेव्हा तो लताजींशी कसा बोलला तेव्हा ते म्हणाले की तुम्ही मला आई म्हणू शकता. अख्तरला आपण तिला भेटू शकलो नाही याची खंत व्यक्त केली.

Shoaib Akhtar And Lata Didi
हार्दिक पांड्या रणजी ट्रॉफी 2022 मध्ये खेळणार नाही

आई म्हणून हाक मारलीस तर बरे होईल

शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) म्हणाले की, "आज एक अतिशय दु:खद बातमी आहे, लताजी या आता आपल्यात राहिल्या नाहीत. मी माझे भाग्य समजतो की, 2016 मध्ये, जेव्हा मी भारतात काम करत होतो, तेव्हा माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. मी त्यांना फोन करून सलाम केला. तेव्हा त्या खूप सुंदर आवाज म्हणाल्या की, कसा आहेस तू बेटा . तेव्हा मी त्यांना म्हणालो, मी ठीक आहे, तूम्ही बऱ्या आहेत ना. तेव्हा लता मंगेशकर म्हणाल्या की, बेटा तू मला आई म्हणून हाक मारलीस तर बरे होईल. तेव्हा मी लतादीदींना आई म्हणालो.

लता मंगेशकर आणि शोएब अख्तर

लता मंगेशकर(Lata Mangeshkar) आणि संगीत हे जसे अविभाज्य आहे तसेच लता मंगेशकर आणि क्रिकेट हे नाते सुध्दा तसेच आहे. लतादीदी जेव्हा शोएब अख्तरने ला म्हणाल्या की, "बेटा मी तुझे बरेच सामने पाहिले आहेत. मी तुझे सामने आणि सचिनचे सामने पाहिले आहेत. मला क्रिकेटची खूप आवड आहे आणि मी तुला ओळखतो. तुझे सामने बघायचो, तू खूप आक्रमक आहेस. तू खूप कठीण खेळायचास, तुझा राग तर सर्वश्रुतच आहे."

आई मला तुला भेटायला यायचं आहे

“मी त्यांना म्हणालो होतो की, आई मला तुला भेटायला यायचं आहे आणि मला ही संधी सोडायची नाही. आई मी मुंबईत असलो तर मी तुला भेटायला नक्की येणार आहे. तेव्हा त्यांनी म्हटले की, बेटा जरूर मला भेटायला ये, मला तुझ्याशी भरपूर बोलायचं आहे. त्या म्हणाल्या की, सध्या नवरात्र चालू आहे, आणि मी 9 दिवस पूजा करत आहे, त्यानंतर आला तर बरे होईल. तेव्हा मी म्हणालो की मी परत आल्यावर तुम्हाला जरूर भेटून जाईन."

Shoaib Akhtar And Lata Didi
T20 World Cup: हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही ते अखेर विराटने केले स्पष्ट

तुला माझे घर माहित आहे का?

"तेव्हा त्या म्हणाल्या की, बेटा आला की जरूर भेटून जाशील, तेव्हा म्हणालो आई मी नक्की भेटेन. जेव्हा लतादीदींनी मला विचारले की, तुला माझे घर माहित आहे का? तेव्हा मी म्हणालो की, संपूर्ण तुमच्या घराचा पत्ता पुर्ण भारताला आणि पाकिस्तानला माहित आहे ईतकेच नव्हे तर जगाला माहित आहे. तेव्हा मी म्हणालो मी नक्की येईन. मला वाटत होतं की, आपण भेटू पण त्याच दरम्यान भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले, मग मी भारतात जाऊ शकलो नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com