T20 World Cup: हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही ते अखेर विराटने केले स्पष्ट

अष्टपैलू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) प्रत्येक सामन्यात किमान दोन षटके देण्याचा आम्ही प्रयत्न करु.
Hardik Pandya & Virat Kohli
Hardik Pandya & Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

टी -20 विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघ (Team India) 24 ऑक्टोबरला पहिला सामना खेळणार आहे. हा सामना पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जाईल. सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने म्हटले की, अष्टपैलू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) प्रत्येक सामन्यात किमान दोन षटके देण्याचा आम्ही प्रयत्न करु.

भारतीय संघाविरुद्ध पाकिस्तान कधीच जिंकला नाही? या प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला की, भूतकाळात काय घडले याकडे आम्ही कधीच लक्ष दिले नाही. आम्ही उद्याच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जो संघ सामन्याच्या दिवशी चांगला खेळेल तो जिंकेल. आम्ही भूतकाळात चांगले खेळलो आहोत, म्हणूनच आम्ही जिंकत आलो आहोत. पाकिस्तानचा संघही मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध आम्हाला योग्य रणनीतीने सामन्यादरम्यान उतरावे लागेल. आम्हीही तेच करु.

Hardik Pandya & Virat Kohli
T20 World Cup 2021: पाकिस्तानची भारताविरुद्धच्या सामन्यासाठी संघाची घोषणा

खेळाडूंना गमावू नका

संपूर्ण जगाने दोन वर्षांहून अधिक काळ कोरोना महामारीचा सामना केला आहे. ते अजूनही कोरोनाशी लढा देत आहेत. दरम्यान, आयपीएल बायोबबलमध्येही सामने खेळले गेले आणि उर्वरित मालिकाही पार पडली. हे सर्व केल्यानंतरही, आपल्याला खेळ आणि मानसिक आरोग्य यांच्यात समानता राखावी लागेल. अन्यथा, असे होऊ नये की, आपण अधिक क्रिकेट खेळण्याच्या शोधात खेळाडू गमावतो. काही लोक बायो बबलमध्ये आनंदी आहेत, याचा अर्थ असा नाही की इतर प्रत्येकजण आनंदी आहे. आपण सर्व खेळाडूंशी संपर्कात राहणे खूप महत्वाचे असल्याचेही कोहलीने यावेळी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com