T20 World Cup 2021: पाकिस्तानची भारताविरुद्धच्या सामन्यासाठी संघाची घोषणा

पाकिस्तानने (Pakistan) भारताविरुद्धच्या सुपर संडेच्या हाय व्होल्टेज सामन्यासाठी आपला 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
 Pakistan Team
Pakistan TeamDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानने (Pakistan) भारताविरुद्धच्या सुपर संडेच्या हाय व्होल्टेज सामन्यासाठी आपला 12 सदस्यीय संघ (Pakistan Team) जाहीर केला आहे. त्यामुळे आता प्लेइंग इलेव्हनचे चित्रही स्पष्ट झाले आहे. सामन्याच्या एक दिवस आधीच घोषित केलेल्या 12 खेळाडूंपैकी एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकणार नाही. आणि तो खेळाडू कोण असेल, हेही जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यावर फक्त अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही.

भारताविरुद्ध प्लेइंग इलेव्हन निवडण्यापूर्वी पाकिस्तानने ज्या 12 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत - बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली. शाहीन शाह आफ्रिदी. हॅरिस रौफ, हैदर

पाकिस्तानच्या गोलंदाजीचे चित्र स्पष्ट झाले!

पाकिस्तानचा हा 12 सदस्यीय संघ पाहून त्यांच्या गोलंदाजीचे संयोजन पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान संघ 3 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकी गोलंदाजांसह भारताविरुद्ध खेळणार आहे. 3 वेगवान गोलंदाजांच्या नावांमध्ये हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ यांचा समावेश असणार आहे. तर इमाद वसीम आणि शादाब खान 2 फिरकीपटू असणार आहेत.

 Pakistan Team
कसा आहे, T20 World Cup मधील भारत पाकिस्तान सामन्यांचा इतिहास

ही टॉप आणि मिडल ऑर्डर असेल

संघाच्या टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरचा प्रश्न आहे, तर भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सलामीची जबाबदारी मोहम्मद रिझवान आणि फखर झमान यांच्या खांद्यावर असेल. हे दोन्ही खेळाडू टीम इंडियासाठी धोका बनू शकतात. यानंतर, बाबर आझमशिवाय मधल्या फळीत मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक असू शकतात. तर, आसिफ अली किंवा हैदर अली यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. आसिफ अली भारताविरुद्ध खेळताना दिसले असेही सूचित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com