India T20 World Cup squad : 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर टी-ट्वेन्टी वर्ल्डकप या कालवधीमध्ये युएई आणि ओमानच्या मैदानात रंगणार आहे. विश्चचषक चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली निवड समिती बुधवारी मुंबईमधील बीसीसीआयच्या मुख्य कार्यालयात बैठक घेण्यात आली. इंग्लंड दौऱ्यावर असलेला टीम इंडियाचा कर्णाधार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ऑनलाईन या बैठकित सहभागी झाले होते. शिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचाही या व्हर्चुअल बैठकिमध्ये सहभागी झाले होते. याच बैठकित टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आली. मात्र सोशल मिडियावर प्रत्यकेजण आपल्या आवडीचा टीम इंडिया संघ निवडत होता. कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळणार अन् कोणत्या खेळाडूचा पत्ता कट होणार अशी चर्चा चालू होती. मात्र या चर्चेला संघ निवडून पूर्णविराम देण्यात आला. पाहूयात टीम इंडियाचा संघ...
टीम इंडिया: कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा , सूर्यकुमार यादव, के. एल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, राहुल चहल, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा सामना केला
या विश्वचषकात टीम इंडियाला गट -2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात त्याच्यासोबत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. तर दोन संघ पात्रता फेरीतून येतील. भारताला आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी ती न्यूझीलंडविरुद्ध उतरेल. 3 नोव्हेंबरला त्याचा सामना अफगाणिस्तानशी होईल. 5 आणि 8 नोव्हेंबर रोजी भारत उर्वरित दोन सामने खेळेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.