T20 World Cup पूर्वी मिसबाह आणि वकारने प्रशिक्षकाची पदाची सोडली खुर्ची

मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक (Misbah-ul-Haq) आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस (Waqar Younis) यांनी आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला असून या वृत्तास पीसीबीनेच दुजोरा दिला आहे.
Waqar Younis & Misbah-ul-Haq
Waqar Younis & Misbah-ul-HaqDainik Gomantak
Published on
Updated on

जर पाकिस्तानमध्ये (Pakistan) गोंधळ नसेल तर हे कसे होईल? अस्थिरता हे पाकिस्तानचे वैशिष्ट्य बनले आहे. मग तिथेच क्रिकेटचा प्रश्न का असेना. आताचचं पहा ना, टी -20 विश्वचषका (T20 World Cup) जवळ आला असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर (Pakistan cricket Board) नवीन प्रशिक्षक शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. होय, टी 20 विश्वचषकासाठी 15 जणांच्या संघाच्या घोषणेनंतर काही तासांनी पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, त्यानुसार मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक (Misbah-ul-Haq) आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस (Waqar Younis) यांनी आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला असून या वृत्तास पीसीबीनेच दुजोरा दिला आहे.

Waqar Younis & Misbah-ul-Haq
T20 World Cup 2021: पाच फलंदाजांच्या भरवशावर पाकिस्तान बनणार चॅम्पियन?

मिस्बाह आणि वकार यांची 2019 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पीसीबीच्या करारानुसार त्यांच्या कार्यकाळाला आणखी एक वर्ष शिल्लक होता. मात्र, आता या दोघांनीही राजीनामा दिल्याने पीसीबीने न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी सकलैन मुश्ताक आणि अब्दुल रज्जाक यांच्यांकडे प्रशिक्षकपदाची कमान सोपवली आहे.

मिसबाहने कुटुंबासाठी प्रशिक्षक पदाची सोडली खुर्ची

मिस्बाह-उल-हकने आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले की, आता त्यांना आपला बहुतेक वेळ कुटुंबासोबत घालवायचा आहे. ते पुढे म्हणाले, “वेस्ट इंडिजमधील मालिका संपल्यानंतर, जेव्हा मला कोरोनामुळे जमैकामध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते, तेव्हा मला माझ्या कुटुंबाला पाहण्याची संधी मिळाली नव्हती. ते बघून मी ठरवले की, आता मी माझ्या कुटुंबालाही वेळ द्यायला हवा. मी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाची खुर्ची सोडण्याचे हेच एक कारण आहे.

तो पुढे म्हणाले, "माझ्या निर्णयासाठी ही योग्य वेळ होती. गेली 2 वर्षे खूप आनंदात गेली. यासाठी मी सर्व टीम आणि व्यवस्थापनाचे आभार मानतो. आगामी क्रिकेट मालिका आणि टी -20 विश्वचषकासाठी मी पाकिस्तान संघाचे अभिनंदन करतो.

Waqar Younis & Misbah-ul-Haq
T20 World Cup: 'भारताविरुद्ध विजयासह सुरुवात करण्यास तयार': Babar Azam

फ्यूचर प्लानिंगमुळे वकारला गोलंदाजी प्रशिक्षकपदावरुन काढून टाकले

दुसरीकडे, वकारने त्याच्या भावी योजनेच्या संदर्भात गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका सोडण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, “पाकिस्तानच्या युवा गोलंदाजांसोबत काम करताना मजा आली. त्यांच्याकडे खूप क्षमता आहे. गेल्या 16 महिन्यांपासून बायो सिक्योर वातावरणात राहणे हा माझ्यासाठी एक अनुभव होता, जो मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत कधीही अनुभवला नव्हता. मात्र, मिसबाह आणि वकार यांनी राजीनामा दिल्यानंतर अंतरिम प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु लवकरच पीसीबी नवीन व्यवस्थापनाची घोषणा करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com