T20 World Cup 2021:भारत सेमी फायनलमध्ये? हे असणार एंट्रीचं गणित

टीम इंडियाला 3 सामन्यात फक्त 1 विजय मिळाला असून भारताचे 2 सामने बाकी आहेत. टीम इंडियाला आता स्कॉटलंड आणि नामिबियाशी सामना करायचा आहे
T20 World Cup 2021 Team India can reach to semi final
T20 World Cup 2021 Team India can reach to semi final Dainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाला (Team India) अखेर T20 World Cup 2021 मध्ये पहिला विजय मिळाला आहे . पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडकडून (New Zealand) झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत अफगाणिस्तानचा(INDvsAFG) पराभव केला आहे . अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 210 धावा करत चांगली सुरूवात केली नंतर फलंदाजी करत अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 144 धावाच करू शकला आणि अफगाणिस्तानने 66 धावांनी सामना गमावला. या मोठ्या विजयानंतर भारताचा रानरेट देखील सुधारत +0.073 झाला आहे आणि या विजयामुळे भारत अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून आहे. टीम इंडिया अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते . (T20 World Cup 2021 Team India can reach to semi final)

टीम इंडियाला 3 सामन्यात फक्त 1 विजय मिळाला असून भारताचे 2 सामने बाकी आहेत. टीम इंडियाला आता स्कॉटलंड आणि नामिबियाशी सामना करायचा आहे, ज्यांच्याविरुद्ध त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. भारताला या दोन संघांना किमान 80 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने पराभूत करावे लागेल तरच ही संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.

भारत आता अफगाणिस्तानवर अवलंबून

भारताला स्वतः चांगला खेळ तर करावाच लागणार आहे मात्र अफगाणिस्तानच्या विजयाची वाढ देखील भारताला पाहावी लागेल. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर ५३ धावांच्या कमी फरकाने मात केल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकेल. अफगाणिस्तानने या मोठ्या फरकाने विजय मिळवला तर हा संघ पात्र ठरेल. दुसरीकडे, न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवल्यास किवी संघ पात्र ठरेल.

हे स्पष्ट आहे की टीम इंडियाला उपांत्य फेरीत पात्र होण्यासाठी नशिबाची गरज आहे परंतु येथे चांगली गोष्ट म्हणजे भारताला या गटातील शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे आणि अंतिम सामन्यात त्यांना काय करायचे आहे हे समजेल. अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या कामगिरीबद्दल बोलाल , तर फलंदाज आणि गोलंदाजांनी कालच्या सामन्यात शानदार खेळ दाखवला आहे.

T20 World Cup 2021 Team India can reach to semi final
T20 World Cup 2021: भारतीय संघांची दिवाळी गोड

काल झालेल्या सामन्यात गोलंदाजीत मोहम्मद शमीने 3 बळी घेतले. अश्विनने 4 षटकात केवळ 14 धावा देत 2 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली. अश्विनने 4 षटकात केवळ 14 धावा देत 2 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारत 2 गटात चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून त्याचा निव्वळ रनरेट आता सकारात्मक आहे. भारताचा निव्वळ रनरेट +0.073 असून न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या पाठीमागेच आहे. गटातील 4 विजयांसह पाकिस्तानचा संघ आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com