T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्याने रचला इतिहास

T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup) मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना विक्रमी 167 दशलक्ष (16.70 कोटी) लोकांनी पाहिला.
 Babar Azam & Virat Kohli
Babar Azam & Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup) मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना विक्रमी 167 दशलक्ष (16.70 कोटी) लोकांनी पाहिला. यासह, हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला जाणारा आंतरराष्ट्रीय T20 सामना ठरला आहे. ICC T20 विश्वचषक 2021 चे अधिकृत प्रसारक स्टार इंडियाने हा दावा केला आहे. यापूर्वी, 2016 T20 विश्वचषकादरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना हा सर्वाधिक पाहिला गेलेला T20 सामना होता. हा सामना 136 दशलक्ष लोकांनी पाहिला होता. स्टार इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत एकूण 238 दशलक्ष लोकांनी T20 विश्वचषक पाहिला आहे. यामध्ये क्वालिफायर आणि सुपर 12 टप्प्यातील सामन्यांचा समावेश आहे.

स्टार इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, '167 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे, 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाणारा भारत-पाकिस्तान सामना सर्वाधिक पाहिला जाणारा T20 आंतरराष्ट्रीय सामना बनला आहे. दोन वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेत या दोन संघांमध्ये टक्कर झाली. यामुळे 2016 वर्ल्ड टी-20 सेमीफायनलमधील भारत-वेस्ट इंडिज सामना मागे पडला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या दर्शकांबाबत, स्टार इंडियाच्या प्रवक्त्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, भारत-पाकिस्तान सामन्याने इतिहास रचला आहे. मोठ्या क्रिकेट सामन्यांसाठी आम्ही प्रेक्षकांची संख्या सातत्याने वाढवत असून आणि हा विक्रम आमचे प्रयत्न दर्शवतो. सामन्याच्या निकालामुळे आणि स्पर्धेतून भारत बाहेर पडल्याने चाहते निराश झाले आहेत. विक्रमी दर्शक संख्या क्रिकेटची ताकद दर्शवते.

 Babar Azam & Virat Kohli
T20 World Cup 2021: विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश

भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला

T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्धच्या सामन्यापासून आपल्या मोहिमेला सुरुवात केली. यामध्ये पाकिस्तानने 10 गडी राखून विजय मिळवला आणि प्रथमच आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताचा पराभव केला. यापूर्वी भारताला 50 किंवा 20 षटकांच्या विश्वचषकात पाकिस्तानकडून कधीही पराभव पत्करावा लागला नव्हता. 2021 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारताला अपयश आले आहे. पाकिस्तानशिवाय न्यूझीलंडकडूनही तो सामना हरला. त्यामुळे अंतिम-4 मध्ये जाण्याची संधी त्याच्या हातातून निसटली. 2012 नंतर प्रथमच भारत आयसीसी स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडला आहे. अन्यथा, गेल्या आठ वर्षांत संघाने किमान प्रत्येक वेळी उपांत्य फेरी गाठली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com