टी -20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) स्पर्धेसाठी गुरुवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) 15 सदस्यीय संघाची घोषणा झाली. मात्र माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस, अनुभवी लेगस्पिनर इम्रान ताहिर (Imran Tahir) आणि अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chris Morris) वगळता दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी आगामी टी -20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ताहिर आणि डु प्लेसिसने खेळाच्या इतर प्रकारांमधून निवृत्ती घेतली होती. टेंबा वावुमा युवा संघाचं नेतृत्व करणार असून त्याच्यावर रविवारी शस्त्रक्रिया झाली होती, ऑक्टोबरच्या मध्यानंतर तंदुरुस्त होण्याची अपेक्षा संघाकडून व्यक्त करण्यात येत आहे. संघात डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजचाही समावेश करण्यात आला असून जो अद्याप टी -20 आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही.
दरम्यान, बावुमाच्या अनुपस्थितीत, श्रीलंकेत होणाऱ्या आगामी टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेत महाराज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य निवडक व्हिक्टर म्पीत्सांग म्हणाले, "केश एक महान नेतृत्वकर्ता आहे." स्पिनर विभागामध्ये महाराजांव्यतिरिक्त तबरेज शम्सी आणि ब्योर्न फोर्टुइन हे संघात तज्ज्ञ गोलंदाज असतील. क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर हे संघातील अनुभवी फलंदाज आहेत तर वेगवान विभागात कागिसो रबाडा (Kagiso Rabada), लुंगी एनगिडी आणि एनरिक नोर्जे यांचा समावेश आहे. जॉर्ज लिंडे, अँडिले फेलुक्वायो आणि लिझाड विल्यम्स यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेला ग्रुप I मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसह स्थान देण्यात आले आहे. टीम: टेंबा बावुमा (क), केशव महाराज, क्विंटन डी कॉक (डब्ल्यूके), ब्योर्न फोर्टुइन, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडन मार्क्राम, डेव्हिड मिलर, डब्ल्यू मुलडर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्जे, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी आणि रासी व्हॅन डर डसेन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.