डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्शच्या झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (2021 T20 World Cup) विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडचे 173 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात ऑस्ट्रेलियाला फारशी अडचण आली नाही. मार्श आणि वॉर्नरच्या झंझावाती अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच T20 वर्ल्ड चॅम्पियन बनला. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचाही ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा होता. हेजलवूडने 4 षटकात 16 धावा देत 3 बळी घेतले. त्याचवेळी अंदम झाम्पानेही 4 षटकात 26 धावा देत 1 बळी घेतला.
न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसनने अप्रतिम खेळी केली. विल्यमसनने 48 चेंडूत 85 धावा केल्या, पण वॉर्नर आणि मार्शसमोर त्याची खेळी निराशाजनक ठरली. वॉर्नर आणि मार्शने दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी करुन न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली.
फिंच अपयशी, वॉर्नर-मार्शने किवीजला लगाम घातला
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना उतरलेल्या कांगारु संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 5 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर त्यांचा कर्णधार अॅरॉन फिंच ट्रेंट बोल्टचा बळी घेतला. यानंतर मिचेल मार्श क्रीझवर आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपला इरादा दाखवून दिला. डेव्हिड वॉर्नरनेही मार्श येताच आक्रमक भूमिका घेतली. दोन्ही फलंदाजांनी अवघ्या 35 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 10 षटकात 82 धावा केल्या आणि यादरम्यान डेव्हिड वॉर्नरने 34 चेंडूत अर्धशतक केले. अर्धशतक झळकावताच वैयक्तिक 53 धावांवर वॉर्नर बोल्टला बळी पडला, परंतु मार्श क्रीजवरच टिकून राहिला.
मार्शने आपली धडाकेबाज फलंदाजी सुरु ठेवली आणि अवघ्या 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये मिचेल मार्श हा सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. त्याने याच सामन्यात 32 चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या केन विल्यमसनचा विक्रम मोडीत काढला. ग्लेन मॅक्सवेलनेही मार्शसोबत शानदार खेळी खेळली आणि त्यांनी मिळून ऑस्ट्रेलियाला पहिला T20 विश्वचषक जिंकून दिला.
विल्यमसनने न्यूझीलंडसाठी ताकद दाखवली
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या किवी संघाची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकात केवळ 11 धावा देऊन डॅरेल मिशेल हेझलवूडचा बळी गेला. मार्टिन गप्टिलने अतिशय संथ खेळ केला आणि पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडच्या संघाला 6 षटकात केवळ 32 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पहिल्या 10 षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखून धरले. किवी संघाला 10 षटकात केवळ 57 धावा करता आल्या. न्यूझीलंडने शेवटच्या 10 षटकांत अप्रतिम पुनरागमन केले. विशेषत: कर्णधार केन विल्यमसनने 32 चेंडूत अर्धशतक तर 48 चेंडूत 85 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर किवी संघाने 172 धावांपर्यंत मजल मारली पण ऑस्ट्रेलियन संघासाठी या धावा कमी होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.