कसा आहे, T20 World Cup मधील भारत पाकिस्तान सामन्यांचा इतिहास

यापूर्वी, दोन्ही संघांमधील टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup) इतिहास काय आहे, याविषयी चला जाणून घेऊया...
India Vs Pakistan
India Vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील संघर्ष नेहमीच लक्ष वेधून घेणारा राहीला आहे. जेव्हा- जेव्हा हे दोन देश क्रिकेटच्या मैदानावर उतरतात, तेव्हा प्रत्येक क्रिकेटप्रेमी या सामन्याची चातकासारखी वाट पाहत असतो. 24 तारखेला पुन्हा संपूर्ण जगाच्या नजरा क्रिकेटच्या मैदानावर असतील कारण या दिवशी दुबईत (Dubai) आयसीसी टी -20 विश्वचषक -2021 (T20 World Cup) च्या सामन्यात हे दोन संघ पुन्हा एकमेकांसमोर येतील. टी -20 विश्वचषकात हे दोन्ही संघ सहाव्यांदा आमने सामने येत आहेत. यापूर्वी, दोन्ही संघांमधील टी-20 विश्वचषकाचा इतिहास काय आहे, याविषयी चला जाणून घेऊया...

टी20 विश्वकपमध्ये वर्ल्ड कपच्या पहिल्या आवृत्तीत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा टी-20 विश्वचषकात भेटले. 14 सप्टेंबर रोजी डर्बनमध्ये झालेल्या सामन्यात 20-20 षटके खेळल्यानंतर दोन्ही संघांची धावसंख्या समान होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने नऊ विकेट गमावून 141 धावा केल्या होत्या. पाकिस्ताननेही सात विकेट गमावून समान धावसंख्या केली होती. यानंतर सामना जेव्हा बॉल आऊटमध्ये गेला तेव्हा मात्र भारताने बाजी मारली.

त्यानंतर, 2007 मध्ये, हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पुन्हा भेटले. 24 सप्टेंबरला जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांना पहिले जेतेपद जिंकण्याची संधी होती. मात्र यामध्येही महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानला नमवत आपल्या विजयाची पताका फडकवली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती. तर गौतम गंभीरच्या 75, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नाबाद 30 धावांच्या मदतीने पाच गडी गमावून 157 धावा उभारल्या होत्या. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ 19.3 षटकांत 152 धावांवर बाद झाला.

India Vs Pakistan
'आम्ही टीम इंडियाला नक्की पराभूत करु': बाबर आझम

यानंतर हे दोन्ही संघ 2012 च्या टी -20 विश्वचषकात आमनेसामने आले होते. 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कोलंबो येथे झालेल्या सामन्यातही भारताने बाजी मारली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 128 धावांचे लक्ष भारतासमोर ठेवले होते. शोएब मलिकने या सामन्यात 28 धावा केल्या होत्या. उमर अकमलने 21 धावांचे योगदान दिले. भारताकडून लक्ष्मीपती बालाजीने (Lakshmipati Balaji) तीन बळी घेतले. रविचंद्रन अश्विन, युवराज सिंग यांच्याकडे प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद 78 धावांच्या जोरावर भारताने हे लक्ष्य 17 षटकांत दोन गडी गमावून साध्य केले.

दोन वर्षांनंतर, 2014 मध्ये, दोन्ही संघ ढाकाच्या मैदानावर पुन्हा एकमेकांसमोर आले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सात गडी गमावून 130 धावा केल्या. मात्र या सामन्यात कोणत्याही पाकिस्तानी फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. उमर अकमलने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली. भारताने हे लक्ष्य 18.3 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. पुन्हा एकदा विराटच्या बॅटने कमाल दाखवली होती. त्याने नाबाद 36 धावा केल्या होत्या. सुरेश रैनानेही नाबाद 35 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

India Vs Pakistan
ICC: पाकिस्तानचा बाबर आझम ठरला एप्रिल महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू

2016 मध्ये टी -20 विश्वचषक भारतातच आयोजित करण्यात आला होता. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्याबद्दल मात्र खूप गदारोळ झाला होता कारण पाकिस्तान भारतात खेळत होता, आणि त्या दरम्यानच राजकारणात काहीशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. मात्र, हा सामना कोलकातामध्ये यशस्वीपणे पार पडला होता. ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. या सामन्यात पाकिस्तानने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने 20 षटकांत पाच गडी गमावून 118 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना अहमद शहजादने 25 धावांची खेळी उभारली. भारताने हे लक्ष्य 15.5 षटकांत पूर्ण केले होते. विराट कोहलीने पुन्हा फलंदाजी केली. त्याने नाबाद 55 धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com