विराट, रोहित नव्हे तर 'हे' खेळाडू ठरु शकतात पाकिस्तानसाठी धोक्याचे

ऑस्ट्रेलिया संघाचे माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन (Matthew Hayden), जे पाकिस्तान संघासोबत फलंदाजी सल्लागार म्हणून काम करत आहेत, त्यांनी एमएस धोनी आणि इऑन मॉर्गनची उदाहरणे देत भारत(India)-पाकिस्तान (Pakistan) सामन्यात कर्णधाराचा रोल महत्त्वाचा असेल.
हे दोन भारतीय (India) फलंदाज पाकिस्तान (Pakistan) संघासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतात.
हे दोन भारतीय (India) फलंदाज पाकिस्तान (Pakistan) संघासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतात.Dainik Gomantak

टी 20 विश्वचषकातील (T20 World Cup) सर्वात मोठा भारत (India) विरुध्द पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामना मानला जात आहे. हा महान सामना या रविवारी 24 ऑक्टोबरला होणार आहे. कर्णधार म्हणून विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्यातील ही लढत रोमांचक असेल. सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघातील फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) सांगितले की, हे दोन भारतीय फलंदाज पाकिस्तान संघासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतात.

हे दोन भारतीय (India) फलंदाज पाकिस्तान (Pakistan) संघासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतात.
T-20 World Cup: पाकिस्तानची फलंदाजी पाहून भारताने तयार केला 'मास्टर प्लॅन'

ऑस्ट्रेलिया संघाचे माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन, जे पाकिस्तान संघासोबत फलंदाजी सल्लागार म्हणून काम करत आहेत, त्यांनी एमएस धोनी आणि इऑन मॉर्गनची उदाहरणे देत भारत-पाकिस्तान सामन्यात कर्णधाराचा रोल महत्त्वाचा असेल असे म्हटले आहे. या धोनी आणि मॉर्गन या दोघांच्या नेतृत्वाखाली केकेआर आणि चेन्नईच्या संघाने आयपीएल 2021 ची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे या मोठ्या सामन्याच्या निकालात देखील नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असेल.

हे दोन भारतीय (India) फलंदाज पाकिस्तान (Pakistan) संघासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतात.
T-20 World Cup: टीम इंडिया करतेय 'गब्बर'ला मिस, विराटचा व्हिडिओ होतोय व्हायरल...

बाबरला फलंदाज तसेच कर्णधार म्हणून आपली भूमिका चोख बजावावी लागेल. धोनी आणि मॉर्गनची उदाहरणे देताना हेडन म्हणाले, स्पर्धेतील त्यांची कामगिरी तितकी चांगली नव्हती जितकी ते ओळखले जातात आणि त्यांनी जे विक्रम केले. पण ज्या प्रकारे त्याने आपल्या संघांचे नेतृत्व केले, आणि त्यांच्या संघांना यूएईमध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मॅथ्यू हेडनने वर्षानुवर्षे भारतीय संघावर बारीक नजर ठेवली आहे. तो म्हणाला, ऋषभ पंत आणि लोकेश राहुल या सामन्यात पाकिस्तानसाठी मोठा धोका शकतात. लोकेश राहुलच्या खेळात चांगली डेव्हलपमेंट झाली आहे. टी -20 मध्ये त्याचे वर्चस्व आहे. राहुल हा पाकिस्तानसाठी धोका ठरु शकतो, त्याच बरोबर ऋषभ पंतला देखील मी त्याला खेळताना पाहिले आहे, तो गोलंदाजांवर जोरदार आक्रमण उद्ध्वस्त करू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com