T20 WC: शोएब मलिकची पाकिस्तान टीम मध्ये एन्ट्री

जखमी सोहेब मकसूदच्या जागी मलिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी शुक्रवारी पाकिस्तानच्या T20 WC विश्वचषक संघात तीन बदल करण्यात आले होते.
T20 WC: Shoaib Malik will play in Pakistan Cricket team says PCB
T20 WC: Shoaib Malik will play in Pakistan Cricket team says PCBDainik Gomantak

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board ) 2021 T20 WC साठी आपल्या 15 सदस्यीय संघात आणखी एक बदल केला आहे. PCB ने आता माजी कर्णधार शोएब मलिकला (Shoaib Malik) पाकिस्तानच्या विश्वचषक संघात (Pakistan Cricket Team) संधी दिली आहे. जखमी सोहेब मकसूदच्या जागी मलिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी शुक्रवारी पाकिस्तानच्या टी -20 विश्वचषक संघात तीन बदल करण्यात आले होते.(T20 WC: Shoaib Malik will play in Pakistan Cricket team says PCB)

अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार शोएब मलिकचा यापूर्वी पाकिस्तानच्या टी -20 विश्वचषक संघात समावेश नव्हता. यासंदर्भात निवड समिती आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून बरीच टीका देखील झाली होती . अनेक माजी क्रिकेटपटूंनीही मलिक यांच्या न निवडण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की काल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2021 टी 20 विश्वचषक संघात तीन बदल केले होते. यामध्ये आझम खानच्या जागी मोहम्मद हसनैन आणि खुशदिल शाह, माजी कर्णधार सरफराज अहमद, फखर जमान आणि हैदर अली यांचा संघात समावेश केला होता.

या सगळ्या गोष्टींवर सप्ष्टीकरण देताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जरी करत ' खेळाडूंची कामगिरी आणि त्यांचा फॉर्म लक्षात घेत निवड समितीने तीन बदल केले आहेत. सरफराज अहमद आणि हैदर अली यांनी अनुक्रमे आझम खान आणि मोहम्मद हसनैन यांची जागा घेतली आहे, तर राखीव खेळाडू फखर जमानला राखीव ठेवण्यात आले आहे, तर खुशदील शाहला मुख्य संघात ठेवण्यात आले आहे अशी माहिती दिली होती.

T20 WC: Shoaib Malik will play in Pakistan Cricket team says PCB
'या' भारतीय ऑफ स्पिनरला फ्रेंच विद्यापीठाने डॉक्टरेट केली बहाल

येणाऱ्या T 20 विश्वचषकात पाकिस्तान मोठ्या तयारीनिशी उतरताना दिसत आहे. संघात आता बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (wk), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (wk), शाहीन शाह आफ्रिदी आणि शोएब मलिक.या खेळाडूंचा समावेश आहे. तर खुशदिल शाह, शाहनवाज दहानी और उस्मान कादिर हे राखीव खेळाडू आहेत.

टी -20 विश्वचषकात पाकिस्तानचे सामने-

• 24 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध भारत

• 26 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड

• 29 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान

• 2 नोव्हेंबर - पाकिस्तान विरुद्ध A2

• 7 नोव्हेंबर - पाकिस्तान विरुद्ध B 1

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com