'या' भारतीय ऑफ स्पिनरला फ्रेंच विद्यापीठाने डॉक्टरेट केली बहाल

टीम इंडियाचे (Team India) सहकारी त्याला भज्जी, भज्जू म्हणतात, तर काही लोक त्याला टर्बनेटर म्हणतात.
Harbhajan Singh
Harbhajan SinghDainik Gomantak

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने (Harbhajan Singh) आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाच्या (Team India) अनेक ऐतिहासिक विजयात आपली भागीदारी नोंदवली. त्याच्या गोलंदाजीची ख्याती अवघ्या विश्वात पसरली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला. हरभजन सिंगला अनेक प्रसिध्द नावांनी ओळखले जाते. टीम इंडियाचे सहकारी त्याला भज्जी, भज्जू म्हणतात, तर काही लोक त्याला टर्बनेटर म्हणतात. परंतु आता हरभजनच्या नावापुढे डॉक्टर लागणार आहे. होय खरचं तुम्हालाही हे ऐकून धक्का बसला असेल ना! फ्रान्समधील एका प्रसिध्द फ्रेंच विद्यापीठाने (French University) भारतीय ऑफ स्पिनरला डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. इकोल सुपीरियर रॉबर्ट डी सॉर्बोने (Ecole Superior Robert de Sorbo) असे या विद्यापीठाचे नाव आहे. या विद्यापीठाने हरभजनला क्रीडा क्षेत्रात पीएचडीची मानद पदवी दिली आहे. हरभजन या दीक्षांत समारंभात भाग घेऊ शकला नाही कारण तो सध्या यूएईमध्ये असून आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) तो भाग आहे. त्याची टीम प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे.

हा सन्मान मिळाल्याबद्दल हरभजनने आनंद व्यक्त केला आहे. क्रिकेट डॉट कॉमने हरभजनच्या हवाल्याने म्हटले आहे. “जर एखादी संस्था तुम्हाला आदर देत असेल तर तुम्ही तो पूर्ण आदराने स्वीकारला पाहिजे. जर विद्यापीठाने मला क्रीडा क्षेत्रात मानद पदवी दिली असेल तर मी त्याचा सन्मान करेन. कारण मी भारतासाठी क्रिकेट खेळले असून लोकांनी मला प्रेम दिले आहे. ही पदवी मिळाल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे.”

Harbhajan Singh
Indian men's hockey team: वडिलांनी गाय विकून घडविले,आता बनलाय भारताची भिंत

या व्यक्तीने हरभजनचे सुचवले नाव

क्रिकट्रेकरच्या अहवालानुसार, हरभजनचे नाव इंडियन फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशन्स (IFUNA) चे उपाध्यक्ष हरचरण सिंह रणौटा (Harcharan Singh Ranauta) यांनी पाठवले होते. हरभजन म्हणाला, “मी डॉ जॉन थॉमस परेड, अध्यक्ष सोरबोने, डॉ विवेक चौधरी, मुकेश त्यागी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला या सन्मानासाठी पात्र ठरवले.

Harbhajan Singh
Indian Hockey Team चा कर्णधार मनप्रीत लवकरच होणार पिता

अशी राहिली हरभजनची कारकीर्द

हरभजन सध्या आयपीएलमध्ये केकेआर संघासोबत आहे. तो बराच काळ संघाच्या अंतिम-11 मध्ये खेळू शकलेला नाही. त्याने या मोसमात तीन सामने खेळले असून त्याला विकेट मात्र घेता आले नाही. त्याने आयपीएल -2021 च्या पहिल्या टप्प्यात हे तीन सामने खेळले. कोलकाताने त्याला दोन कोटी रुपयांच्या बोली लावून आपल्या संघात घेतले. तो बराच काळ भारतीय संघाबाहेर असून त्याने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. हरभजनने भारतासाठी 103 कसोटी सामने खेळले असून 417 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात त्याने भारतासाठी 236 सामने खेळले असून 269 विकेट्स घेतल्या आहेत. टी -20 मध्ये हरभजनने भारतासाठी 28 सामने खेळले असून 25 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत त्याने हॅटट्रिक घेत इतिहास रचला होता. भारताच्या महान फिरकीपटूंमध्ये त्याची गणना होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com