भारतीय संघ (Indian Team) टी 20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) मध्ये जेतेपदाचा सर्वाधिक दावेदार का आहे, याचे उत्तर काल झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या (England) सराव सामन्यात मिळाले आहे. दुबईत (Dubai) खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 5 बाद 188 धावा केल्या, पण टीम इंडियासाठी हे लक्ष्य फार मोठे होते असे वाटलेच नाही. केएल राहुलने (KL Rahul) 24 चेंडूत 51 धावा केल्या, तर ईशान किशनने (Ishaan Kishan) 46 चेंडूत धडाकेबाज 70 धावा करुन तो नाबाद रिटायर्ड झाला. त्याने या डावात 7 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेटही 150 पेक्षा जास्त होता. पंतनेही नाबाद 29 धावा केल्या.
इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 49 तर मोईन अलीनेही 20 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने 20 चेंडूत 30 धावा केल्या. परंतु या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मात्र निराशा केली. भुवनेश्वर कुमारने 4 षटकांत 54 धावा दिल्या. शमीने 3 विकेट्स घेत 40 धावा दिल्या. राहुल चहरनेही एका घेत 43 धावा दिल्या.
भुवी-राहुल चहर निराश
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉय आणि जोस बटलरने यांनी चांगली सुरुवात केली. पण दोघेही शमीच्या उत्कृष्ट चेंडूंना बळी पडले. डेव्हिड मलाननेही 18 धावा केल्या आणि राहुल चहरच्या गुगलीने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतण्यास भाग पाडले. 10 व्या षटकापर्यंत भारतीय गोलंदाजी चांगली होती पण त्यानंतर बेअरस्टो आणि लिव्हिंगस्टोनने भारतीय गोलंदाजांवर तुटून पडत भारताला बॅकफूटवर ढकलले. बेअरस्टोने 36 चेंडूत 49 धावा आणि लिव्हिंगस्टोनने 20 चेंडूत 30 धावा केल्या. मोईन अलीने देखील आयपीएल मधील त्याचा फॉर्म कायम ठेवत फटकेबाजी केली. मोईन अलीने केवळ 20 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या.
राहुल-ईशानने केली धडाकेबाज सुरुवात
189 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात केएल राहुल आणि ईशान किशनने यांनी अपेक्षे प्रमाणे धडाकेबाज केली. सुरुवातील ईशान थोडा चाचपडत खेळताना दिसत होता पण केएल राहुलने मात्र आपला क्लास दाखवत दुसऱ्या बाजुने फटकेबाजी केली. राहुलकडे इंग्लिश गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूला तेवढेच कडक उत्तर होते. राहुलने आपले अर्धशतक 23 चेंडूत पूर्ण केले पण पुढच्याच चेंडूवर तो मार्क वुडच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ईशान किशनसोबत 50 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली.
राहुल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली क्रिझवर आला पण तो फार काळ टिकू शकला नाही. विराट कोहली 13 चेंडूत 11 धावा केल्या. दुसरीकडे, ईशान किशनच्या बॅटमधून उकृष्ट फटके निघत होते. त्याने 46 चेंडूत आक्रमक 70 धावा करुन तो रिटायर्ड झाला. ऋषभ पंतनेही चांगली फलंदाजी करत आपल्या डावात 3 षटकार आणि एक चौकार लगावला. सूर्यकुमार यादव मात्र या सामन्यात फ्लॉप ठरला, त्याने 9 चेंडूत 8 धावा केल्या. हार्दिक पंड्याने 10 चेंडूत नाबाद 12 धावा करत भारताला या सामन्यात विजय मिळवून दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.