Bhuvneshwar Kumar: भुवीचा भेदक मारा! अवघ्या 9 चेंडूत घेतल्या 5 विकेट्स, वाचा सविस्तर

Karnataka vs Uttar Pradesh: भुवनेश्वर कुमारने टी20 सामन्यात 9 चेंडूंत 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला.
Bhuvneshwar Kumar
Bhuvneshwar KumarBCCI Domestic

Syed Mushtaq Ali Trophy 2023, Karnataka vs Uttar Pradesh, Bhuvneshwar Kumar 5 Wickets:

भारतात एकिकडे वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरू असतानाच दुसरीकडे सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी ही देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत बुधवारी उत्तर प्रदेश विरुद्ध कर्नाटक संघात सामना झाला. या सामन्यात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने कहर कारनामा केला आहे.

या सामन्यात भुवनेश्वरने 9 चेंडूतच 5 विकेट्स घेण्याची करामात केली आणि उत्तर प्रदेशच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात उत्तर प्रदेशने कर्नाटकसमोर विजयासाठी 197 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकला 18.3 षटकात 156 धावाच करता आल्या. त्यामुळे उत्तर प्रदेशने 40 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, भुवनेश्वरने 3.3 षटकात 16 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

Bhuvneshwar Kumar
World Cup 2023: डी कॉक ऑन फायर! स्पर्धेतील ठोकलं तिसरं शतक, आता निशाण्यावर रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड

झाले असे की कर्नाटकने 197 धावांचा पाठलाग करताना 16 षटकात 5 बाद 139 धावा केल्या होत्या. या वेळी 17 व्या षटकात भुवनेश्वर गोलंदाजीला आला. हे त्याचे तिसरे षटक होते. त्याने गोलंदाजी केलेल्या त्याच्या पहिल्या दोन षटकात 14 धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याने डावाच्या 17 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर अभिनव मनोहरला 13 धावांवर त्रिफळाचीत केले.

तसेच त्यानंतर त्याच्या दुसऱ्या चेंडूवर कृष्णप्पा गॉथमने एक धाव काढली, तर तिसऱ्या चेंडूवर त्याने मनोज भंडागेला 13 धावांवर शिवा सिंगच्या हातून झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने शुभांग हेगडेला शुन्यावर पायचीत केले.

त्यानंतर या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विजयकुमार वैशाखने एक धाव काढली, तर सहाव्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही.

Bhuvneshwar Kumar
World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेचा कहर! आठव्यांदा 350हून जास्त धावा करत मोडला ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

त्यानंतर पुन्हा भुवनेश्वर डावाचे 19 वे षटकत, तर त्याचे चौथे षटक टाकण्यासाठी आला. यावेळी त्याने पहिल्याच चेंडूवर वैशाखला 2 धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही.

त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विधवत कावेरप्पाला त्याने त्रिफळाचीत करत कर्नाटकचा डाव संपुष्टात आणला. त्याने त्याच्या पहिल्या दोन षटकांनंतर टाकलेल्या 9 चेंडूत 5 विकेट्स घेतल्या. भुवनेश्वरची टी20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात ५ विकेट्स घेण्याची ही पाचवी वेळ आहे.

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी केलेल्या उत्तर प्रदेशकडून सलामीवीर अभिषेक गोस्वामीने 50 चेंडूत 77 धावांची खेळी केली. तसेच नितीश राणाने 40 धावांची खेळई केली. तर अखेरीस रिंकू सिंगने 31 आणि ध्रुव जुरेलने 25 धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे उत्तर प्रदेशने 20 षटकात 4 बाद 196 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com