स्विंग सुलतान वसीम नेटवरून थेट पोहोचला पाकिस्तानी संघात, पत्नीने बदलले आयुष्य

अक्रमला स्विंगचा सुलतान म्हणतात. हा डावखुरा गोलंदाज फक्त त्याच्या स्विंगमुळेच नव्हे तर त्याच्या वेगानेही फलंदाजांना अडचणीत आणत
Pakistani Player Wasim Akram
Pakistani Player Wasim AkramTwitter
Published on
Updated on

क्रिकेट जगतात अनेक गोलंदाज झाले आहेत, पण पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमची जागा वेगळी आहे. अक्रमला स्विंगचा सुलतान म्हणतात. हा डावखुरा गोलंदाज फक्त त्याच्या स्विंगमुळेच नव्हे तर त्याच्या वेगानेही फलंदाजांना अडचणीत आणत असे. तो असा गोलंदाज होता ज्याला स्विंग आणि वेग दोन्ही होते. यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) हा माजी गोलंदाज जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांमध्ये गणला जातो. (Pakistani Player Wasim Akram Birthday)

याच वसीम अक्रम आज त्याचा वाढदिवस (Wasim Akram) साजरा करत आहे. अक्रमने पाकिस्तानचे कर्णधारपदही भूषवले आहे आणि आता तो अनेकवेळा कॉमेंट्री करतो. चॅनल्समध्ये क्रिकेट तज्ञ म्हणूनही काम करतो. वसीमची कारकीर्द एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही, ज्यामध्ये त्याच्या दिवंगत पत्नीचीही महत्त्वाची भूमिका होती.

Pakistani Player Wasim Akram
शाकिब अल हसन बनला बांगलादेशचा कसोटी कर्णधार, बंदीमुळे हिरावले होते कर्णधारपद!

कोणत्याही देशाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी त्या देशाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमवावे लागते, परंतु अक्रमने एकही प्रथम श्रेणी आणि लिस्ट-ए सामना न खेळता संघात स्थान मिळवले होते. यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी छाप सोडली की संपूर्ण जग त्याला ओळखू लागले. अक्रमला संघात आणण्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यांचा मोलाचा वाटा होता, पण त्याची दिवंगत पत्नी हुमा हिनेही त्याच्या कारकिर्दीला आयाम देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. खुद्द मियांदादने ही गोष्ट सांगितली.

पहिल्या नजरेत केले प्रभावित

मियांदादने अक्रमला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो पहिल्याच नजरेत त्याच्या खेळाच्या प्रेमात पडला होता. मियांदाद सरावासाठी नेटवर गेला आणि त्यानंतर त्याने अक्रमला पाहिले आणि तिथून त्याने अक्रमला पाकिस्तान संघात आणले. आपल्या यूट्यूब शोमध्ये अक्रमच्या निवडीबद्दल बोलताना मियांदाद म्हणाला, “मी नेटवर पाहत होतो. तिथे तो अक्रम गोलंदाजी करत होता. मी ते पाहिले, मला ते खूप आवडले. मी त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार होतो. मी संघासाठी अक्रमचे नाव सुचवले.

बट साहेब म्हणू लागले की हा मुलगा फर्स्ट क्लास वगैरे काही खेळला नाही. म्हणून याला आपण संघात घेऊ शकत नाही. मात्र मंडळाचे अध्यक्षांनी कर्णधार म्हणत असेल तर अक्रम ला घ्या या अटिवर टिममध्ये त्याला स्थान मिळाले. ही गोष्ट 1984 ची आहे आणि त्याच वर्षी वसीम अक्रमने 25 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले आणि 23 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानमध्ये त्याच संघाविरुद्ध वनडे पदार्पण केले.

Pakistani Player Wasim Akram
Video: Trent Boult ने Steve Smith ला दिले वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट

या बदलाचे श्रेय हुमाला देण्यात आले

मियांदाद म्हणाला की, अक्रम आज त्याच्या मेहनतीमुळे आहे आणि त्याचे श्रेय त्याची पत्नी हुमाला द्यावे लागेल. हुमाचे 2009 मध्ये निधन झाले. अक्रम हा त्याच्या मेहनतीमुळेच आहे, पण मी हुमाला श्रेय देतो. अक्रमला पॉलिश करण्यात हुमाने मोठी भूमिका बजावली आहे. मला आठवते ती अक्रमला शिक्षण द्यायची. लँकेशायरकडून तो क्रिकेट खेळत असताना हा प्रकार घडला. इथून वसीममध्ये खूप बदल झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com