Suryakumar Yadav: 'मी सध्या चालतोय...', शतकानंतर फिल्डींगवेळी झालेल्या दुखापतीवर सूर्यकुमारने दिली अपडेट

South Africa vs India: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 दरम्यान सूर्यकुमारच्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मैदानातून बाहेरही जावे लागले होते.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavX
Published on
Updated on

South Africa vs India, 3rd T20I Match at Johannesburg, Surykumar Yadav Injury update:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी20 सामना गुरुवारी (14 डिसेंबर) पार पडला. या सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.

मात्र, या सामन्यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याने भारतीय संघाची चिंता वाढली होती. याबद्दल सामन्यानंतर त्यानेच माहिती दिली आहे.

या सामन्यात सूर्यकुमारने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून शतकी खेळी केली होती. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 202 धावांचे आव्हान ठेवले होते. दरम्यान, 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ उतरला असताना तिसऱ्या षटकात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली.

Suryakumar Yadav
SA vs IND, 3rd T20I: सूर्याचा द. आफ्रिकेला दणका! शतकासह मिस्टर 360 ने केली रोहित शर्माच्या रेकॉर्डशी बरोबरी

झाले असे की या षटकात रिझा हेंड्रिक्सने मारलेल्या शॉटवर चेंडू आडवण्यासाठी धावत असताना सूर्यकुमारचा पाय मुरगळला. त्यामुळे त्याला वेदना झाल्या. त्यानंतर लगेचच भारताची वैद्यकिय टीम मैदानात आली होती. पण सूर्यकुमारला त्यावेळी चालताही येत नसल्याने बाहेर उचलून न्यावे लागले. त्यामुळे उर्वरित सामन्यात उपकर्णधार रविंद्र जडेजाने भारतीय संघाचे नेतृत्व केले.

दरम्यान, सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतीबद्दल म्हणाला, 'मी ठिक आहे आणि सध्या चालतही आहे. त्यामुळे ही दुखापत खूप गंभीर आहे, असे वाटत नाहीये.'

तसेच सामन्यातील कामगिरीबद्दल सूर्यकुमार म्हणाला, 'शतक केल्यानंतर छानच वाटते, विशेषत: जेव्हा त्या शतकानंतर तुम्ही विजय मिळवता. आमची आक्रमक क्रिकेट खेळण्याची योजना होती, जी आम्ही यशस्वी पूर्ण केली. खेळाडूंनी दाखवलेल्या कामगिरीबद्दल आनंदी आहे. कुलदीप तीन आणि चार विकेट्स घेऊन समाधानी राहत नाही. त्याच्यासाठी त्याचे सर्वोत्तम वाढदिवसाची भेट होती.'

Suryakumar Yadav
SA vs IND, 3rd T20I: जितेश शर्माच्या नावावर नोंदवला गेला नकोसा रेकॉर्ड; श्रेयस-राहुलच्या क्लबमध्ये सामील

या सामन्यात कुलदीप यादवने 2.5 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला 13.5 षटकात 95 धावांवरच रोखण्यात भारतीय संघाला यश मिळाले.

दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली, तर कर्णधार एडेन मार्करमने 25 धावा केल्या. तसेच डेनोव्हन फरेराने 12 धावा केल्या. या तिघांनाच 10 धावांचा टप्पा ओलांडता आला.

तत्पुर्वी या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 201 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमारने 56 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 100 धावांची खेळी केली. तसेच यशस्वी जयस्वालने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराज आणि लिझाड विल्यम्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com