SA vs IND, 3rd T20I: सूर्याचा द. आफ्रिकेला दणका! शतकासह मिस्टर 360 ने केली रोहित शर्माच्या रेकॉर्डशी बरोबरी

Suryakumar Yadav Century: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळला जात आहे.
Suryakumar Yadav Century
Suryakumar Yadav CenturyDainik Gomantak
Published on
Updated on

Suryakumar Yadav Century: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांनी शानदार फलंदाजी केली. या सामन्यात सूर्याने शानदार शतक झळकावत मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

सूर्याचं शानदार शतक

दरम्यान, सूर्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट खेळी केली. त्याने आपल्या विस्फोटक खेळीने सर्वांची मने जिंकली. त्याने आपल्या 100 धावांच्या खेळीत 8 षटकार आणि 7 चौकार लगावले. सूर्याने 55 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील त्याचे हे चौथे शतक आहे. विशेष म्हणजे, चार वेगवेगळ्या देशांमध्ये T20 मध्ये शतके करणारा सूर्यकुमार हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. यासह, तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये संयुक्तपणे सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. त्याने रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेलच्या शतकाशी बरोबरी केली आहे. त्याचबरोबर, त्याने बाबर आझमला मागे टाकले. बाबरने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन शतके झळकावली आहेत.

दुसरीकडे, टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 118 षटकार लगावले आहेत. त्याचबरोबर, सूर्या 123 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 182 षटकारांसह रोहित अव्वल स्थानावर आहे.

Suryakumar Yadav Century
SA vs IND, 3rd T20I: द. आफ्रिकेने जिंकला टॉस! 'हा' खेळाडू करणार पदार्पण, पाहा प्लेइंग-11

सूर्या आणि यशस्वीने डाव सावरला

तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमावून 201 धावा केल्या. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 100 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही 60 धावांची शानदार खेळी केली. रिंकू सिंहने 14 आणि शुभमन गिलने 12 धावांचे योगदान दिले. या सामन्यात तिलक वर्मा फ्लॉप ठरला. तिलकला खातेही न उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराज आणि विल्यम्सने प्रत्येकी 2 बळी घेतले. या सामन्यात केशव महाराजने शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. आता हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 202 धावांचे लक्ष्य आहे.

Suryakumar Yadav Century
IND vs AUS, 3rd T20I: ऑस्ट्रेलिया संघात हेडचे कमबॅक, तर भारतीय संघातही मोठा बदल, पाहा 'प्लेइंग-11'

T20I मध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू:

सूर्यकुमार यादव- 4 शतके

रोहित शर्मा - 4 शतके

ग्लेन मॅक्सवेल- 4 शतके

बाबर आझम- 3 शतके

कॉलिन मुनरो - 3 शतके

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com