ICC Latest T20 Ranking: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल 2023 मध्ये आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला असला तरी टी-20 क्रिकेटमध्ये त्याची बादशाहत कायम आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) T20 फलंदाजांची ताजी क्रमवारी (ICC T20 Ranking) जाहीर केली आहे. सूर्यकुमार यादव यावेळीही टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
सूर्यकुमार यादव ICC (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. सूर्यकुमार 906 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
त्याचवेळी पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला 13 गुणांचे नुकसान झाले. तो 798 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असला तरी.
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमचे आता 769 गुण झाले आहेत. मात्र त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झाला नाही. तो तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याचबरोबर विराट कोहली (Virat Kohli) 15व्या स्थानावर कायम आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेत पाकिस्तान सध्या 2-1 ने आघाडीवर आहे.
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने या मालिकेत आतापर्यंत शतक झळकावले आहे. अशा परिस्थितीत बाबर आझमला आगामी टी-20 क्रमवारीत मोहम्मद रिझवानला मागे टाकण्याची संधी असेल. त्याचवेळी, त्याला सूर्यकुमार यादवच्या पंक्तित यायला आवडेल.
टॉप-10 गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या ताज्या ICC T20 रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खान (Rashid Khan) देशबांधव फझलहक फारुकी, ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांच्या पुढे गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. त्याचबरोबर शाकिब अल हसन अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.