T20 Ranking: आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंची भरारी, 'हे' दोन खेळाडू...!

Renuka Singh: महिला T20 विश्वचषक सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. भारतीय संघाने आयर्लंडला पराभूत करत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
Renuka Singh | India Women Cricket Team
Renuka Singh | India Women Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

T20 Ranking: महिला T20 विश्वचषक सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. भारतीय संघाने आयर्लंडला पराभूत करत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू शानदार प्रदर्शन करत आहेत.

विशेष म्हणजे, या कामगिरीचा परिणाम नव्याने जाहीर झालेल्या ICC T20 क्रमवारीत दिसून आला आहे. भारतीय खेळाडूंनी टी-20 क्रमवारीत चांगलीच चमक दाखवली आहे.

भारतीय खेळाडू अप्रतिम

भारताची यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर यांनी बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC महिला टी-20 क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट T20 क्रमवारी गाठली.

दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये काही चांगल्या धावसंख्येनंतर, घोष प्रथमच फलंदाजांच्या महिला T20 क्रमवारीत अव्वल 20 मध्ये पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात तिने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 41 आणि इंग्लंडविरुद्ध 47 धावा केल्यामुळे ती 20 व्या स्थानावर पोहोचली.

Renuka Singh | India Women Cricket Team
ICC T20 Rankings: ICC T20 क्रमवारीत भारतीय खेळाडूंची चलती, ईशान किशनची धाकड कामगिरी

ऋचा घोषची शानदार कामगिरी

उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) (3रा), शफाली वर्मा (10वा), जेमिमाह रॉड्रिग्स (12वा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर 13व्या क्रमांकावर आहेत. यातच ऋचा घोष टॉप 20 मध्ये प्रवेश करणारी पाचवी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

दुसरीकडे, ऑल राऊंडर ताहलिया मॅकग्राने अव्वल स्थान पटकावले आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत, रेणुकाने इंग्लंडविरुद्ध 15 धावांत पाच विकेट्स घेतल्यामुळे ती कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवी खेळाडू ठरली आणि तिने 7 स्थानांची झेप घेतली.

Renuka Singh | India Women Cricket Team
T20 Ranking: सूर्याचा जलवा, ICC T20 Ranking मध्ये धडक मोहीम

मुनिबा अलीला मोठा फायदा झाला

पाकिस्तानची डावखुरी सलामीवीर फलंदाज मुनीबा अलीने 10 स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम 64 व्या स्थानावर पोहोचली. ती आपल्या देशातील T20I शतक झळकावणारी पहिली महिला ठरली आहे.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने बांगलादेशविरुद्ध नाबाद 48 धावांची खेळी केल्याने चौथ्या स्थानावर पोहोचली आहे, तर न्यूझीलंडची माजी कर्णधार सुझी बेट्सने बांगलादेशविरुद्ध नाबाद 81 आणि श्रीलंकेविरुद्ध 56 धावांची खेळी केल्याने दोन स्थानांची प्रगती झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com