Suresh Raina revealed received Captaincy offers: भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने आत्तापर्यंत अनेकदा चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या खेळींच्या चर्चा नेहमीच होत असतात. पण आता रैनाने त्याला काही संघांकडून कर्णधारपदाच्या ऑफर आल्या होत्या, एक मोठा खुलासा केला आहे.
रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीसपर्यंत एमएस धोनीसह महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने चेन्नईसाठी सर्वाधिक धावाही केल्या आहेत. त्याने चेन्नईला अनेक सामने जिंकूनही दिले आहेत. त्यामुळे त्याला मिस्टर आयपीएल असे टोपन नावही मिळाले.
रैनाने सांगितले की 'मी उत्तर प्रदेश आणि चेन्नईचे नेतृत्व केले आहे. त्याच्याव्यतिरिक्त दुसऱ्या संघांकडूनही मला कर्णधारपदासाठी संपर्क करण्यात आला होता. पण धोनी भाई म्हणायचा तू कुठेही जाऊ नकोस, मी कर्णधार आहे, तू उपकर्णधार आहे.'
'मी त्याला सांगितले माझा नेतृत्व करण्याचा हेतू नाही. मला फक्त खेळायचे आहे आणि माझा हेतू माझ्या देशाला जास्तीत जास्त विजय मिळवून देण्याचाच आहे. जर मला संधी मिळाली, तर मी त्यासाठी खूप मेहनत करेल, पण मनात अशी कोणतीही इच्छा मी बाळगली नव्हती. मला नेहमीच वाटते की मी टीम प्लेअर आहे आणि मला माझ्या संघसहकाऱ्यां आणि त्यांना त्यांच्या समस्यांमध्ये मदत करण्याने आनंद मिळतो.'
दरम्यान रैना २००८ ते २०२१ या दरम्यान एकूण १३ वर्षे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. पण २०१६ आणि २०१७ मध्ये चेन्नईवर बंदी असताना तो गुजरात लायन्सकडून कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये खेळला. पण त्यानंतर २०१८ मध्ये तो पुन्हा चेन्नई संघात आला होता.
रैना आणि धोनी मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही एकत्रच निवृत्ती घेतली होती. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर लगेचच काही वेळात त्याचदिवशी रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती जाहिर केली होती.
रैनानने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 18 कसोटी सामने खेळले असून 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 768 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 226 वनडे सामन्यांत 5 शतके आणि 36 अर्धशतकांसह 5615 धावा केल्या आहेत.
याशिवाय तो 78 आंतरराष्ट्रीय टी२० सामनेही खेळला. यामध्ये त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 1605 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 62 विकेट्सही घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये 205 सामने खेळला असून 5528 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.