Suresh Raina: अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैनाचे नाव आजही भारताला मिळालेल्या प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये घेतले जाते. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक सामनेही भारताला जिंकून दिले आहेत. पण त्याने सर्वांना आश्चर्यचकीत तेव्हा केले होते, जेव्हा त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
खरंतर त्यादिवशी संध्याकाळी भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच काही वेळात रैनानेही वयाच्या 33 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णायबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. पण आता त्याच्या निवृत्तीचे कारण त्याने स्पष्ट केले आहे.
रैनाने त्याच्या निवृत्तीबद्दल स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले की 'आम्ही (धोनी आणि रैना) अनेक सामने एकत्र खेळलो. मी भाग्यशाली आहे की मला त्याच्याबरोबर भारतासाठी आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळायला मिळाले. आम्हाला खूप प्रेम मिळाले. मी गझियाबादमधून आणि धोनी रांचीमधून आला होता.'
'मी धोनीसाठी खेळलो, मग मी देशासाठी खेळलो. आमचे असे नाते आहे. आम्ही अनेक अंतिम सामने एकत्र खेळलो, आम्ही वर्ल्डकप जिंकला. तो महान कर्णधार आणि चांगला व्यक्ती आहे.'
धोनीने 2004 साली, तर रैनाने 2005 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. त्यानंतर ते अनेकवर्षे भारतीय संघात एकत्र खेळले. तसेच धोनीच्या नेतृत्त्वाखाली 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघात रैनाचाही समावेश होता.
याबरोबरच धोनी आणि रैना आयपीएलमध्येही अनेकवर्षे चेन्नई सुपर किंग्सकडून एकत्र खेळले. त्यामुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती.
('I played for MS Dhoni, then I played for the country', said Suresh Raina)
दरम्यान, धोनी आणि रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही ते 2021 आयपीएल हंगाम चेन्नई सुपर किंग्सकडून एकत्र खेळले. पण त्यानंतर रैना आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला. यानंतर रैनाने भारतीय क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली, तर धोनी अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे.
रैनानने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 18 कसोटी सामने खेळले असून 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 768 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 226 वनडे सामन्यांत 5 शतके आणि 36 अर्धशतकांसह 5615 धावा केल्या आहेत.
याशिवाय तो 78 आंतरराष्ट्रीय टी२० सामनेही खेळला. यामध्ये त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 1605 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 62 विकेट्सही घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये 205 सामने खेळला असून 5528 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.