100 चेंडूत 241 धावा, 69 चौकार आणि षटकार… सनरायझर्सच्या फलंदाजांनी 'द हंड्रेड'मध्ये घातला धुमाकूळ; अनेक मोठे रेकॉर्ड मोडले VIDEO

Sunrisers Leeds vs London Spirit 241 Runs Record: सनरायझर्सच्या या तुफानी फलंदाजीत सलामीवीर मिचेल मार्श आणि रायन रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 65 चेंडूंत 148 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली.
Sunrisers Leeds 241 Runs Record
Sunrisers Leeds 241 Runs RecordDainik Gomantak
Published on
Updated on

The Hundred Highest Team Score: इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या 'द हंड्रेड' लीगच्या इतिहासातील सर्वात स्फोटक आणि थरारक सामना मंगळवारी (4 ऑगस्ट) हेडिंग्ले स्टेडियमवर पाहायला मिळाला. लंडन स्पिरिट संघाने टॉस जिंकून सनरायझर्स लीड्सला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले, परंतु हा निर्णय त्यांच्यासाठी पूर्णपणे अंगलट आला. सनरायझर्सच्या फलंदाजांनी लंडनच्या गोलंदाजांची पुरती दाणादाण उडवत अवघ्या 100 चेंडूंत 2 गडी गमावून 241 धावांचा डोंगर उभारला आणि 'द हंड्रेड'च्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येचा नवा रेकॉर्ड नोंदवला.

सनरायझर्सच्या या तुफानी फलंदाजीत सलामीवीर मिचेल मार्श आणि रायन रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 65 चेंडूंत 148 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली, जी या लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली. रिकल्टनने 42 चेंडूंत 6 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा कुटल्या, तर मार्शने 37 चेंडूंत 76 धावांची वादळी खेळी खेळली. त्यानंतर आलेल्या कर्णधार हॅरी ब्रूकने अवघ्या 15 चेंडूंत धडाकेबाज अर्धशतक ठोकून संयुक्तपणे सर्वात जलद 50 धावांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. ब्रूकने 18 चेंडूंत 55 धावांची वादळी खेळी खेळली. सनरायझर्सच्या डावात 18 चौकार आणि 21 षटकारांसह एकूण 39 बाउंड्री लगावल्या गेल्या, जो एका डावातील नवा रेकॉर्ड आहे.

Sunrisers Leeds 241 Runs Record
Team India: टीम इंडियात सर्व काही आलबेल नाही? गौतम गंभीर-अजीत अगरकर यांच्यात मतभेद? माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

242 धावांच्या विशाल आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंडन (London) स्पिरिटच्या संघानेही चिकाटी दाखवत आक्रमक पवित्रा घेतला. डेव्हिड विलीने 46 चेंडूंत 83 धावांची आतिशी खेळी खेळली, ज्याला डेवाल्ड ब्रेव्हिस (38) आणि लियाम लिविंगस्टन (34) यांनी चांगली साथ दिली. लंडन स्पिरिटने 100 चेंडूंत 6 गडी गमावून 204 धावांपर्यंत मजल मारली, परंतु अखेर त्यांना 37 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Sunrisers Leeds 241 Runs Record
Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

या संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. दोन्ही डावा मिळून या एकाच सामन्यात तब्बल 69 चौकार मारले गेले, जो 'द हंड्रेड' लीगच्या इतिहासातील एकाच सामन्यातील सर्वाधिक चौकाराचा नवा कीर्तिमान ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com