Sunil Narine: 7 ओव्हर, 7 विकेट्स, 0 धावा...! फ्लाईट लेट झाली म्हणून क्रिकेट खेळयला गेला अन् कहर केला

केकेआरचा स्पिनर सुनील नारायणने 7 षटकात एकही धाव न देता 7 विकेट्स घेण्याची कहर कामगिरी केली आहे.
Sunil Narine
Sunil NarineDainik Gomantak

Sunil Narine 7 Wickets in 7 Maiden Overs: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. याचाच प्रत्येय पुन्हा एकदा आला आहे. वेस्ट इंडिजचा स्पिनर सुनील नारायणने कमालीचा खेळ करत सर्वांना चकीत केले आहे. त्याने एका स्थानिक सामन्यात चक्क 7 षटकात एकही धाव न देता 7 विकेट्स घेतल्या आहेत.

आश्चर्याची गोष्ट अशी की आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) नारायण निघाला होता. पण त्याची फ्लाईटला उशीर झाला असल्याचे त्याला कळले. त्यामुळे तो टी अँड टी क्रिकेट बोर्ड प्रीमियरशिप डीव्हिजन 1स्पर्धेत खेळायला गेला. त्याने क्विन्स पार्क क्रिकेट क्लबकडून क्लार्क रोड युनायडेट विरुद्ध क्विन्स पार्क ओव्हल मैदानात सामना खेळला.

त्याने या सामन्यात अविश्वसनीय गोलंदाजी केली. नारायण सध्या दमदार फॉर्ममध्ये असून त्याने खेळलेल्या गेल्या तीन सामन्यांमध्ये दमदार गोलंदाजी करताना ३० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Sunil Narine
IPL 2023: दुखापतग्रस्त जेमिसनच्या जागेवर CSK संघात दाखल झाला 'हा' धाकड वेगवान बॉलर

दरम्यान, या सामन्यात क्विन्स पार्कने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात जॉन रु जॅगेसर आणि सिऑन हॅकेट यांनी क्वार्क रोडचे पहिलेय तीन फलंदाज बाद केले होते. त्यानंतर नारायणने त्याच्या फिरकीची जादू दाखवण्यास सुरुवात केली.

क्लार्क रोडचे डी जोर्न चार्ल्स, निकोलस सुखदेवसिंग आणि जोशुआ परसौआद यांनी विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर नारायणने ७ षटके गोलंदाजी करताना सर्व षटके निर्धाव टाकली. इतकेच नाही, तर उर्वरित सातही विकेटही घेतल्या.

Sunil Narine
MLC: अमेरिकेतही आता IPL फ्रँचायझींच्या टीम! टी20 लीगसाठी MI, CSK सह 'या' संघांनी केली गुंतवणूक

त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे क्लार्क रोड संघ 76 धावांमध्येच 24 षटकात सर्वबाद झाला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या क्विन्स पार्क संघाने चांगला खेळ करत 3 बाद 268 धावांवर डाव घोषित केला. दरम्यान, या सामन्यात नारायणने केलेल्या गोलंदाजीचे अनेकांनी कौतुक केले.

आता नारायण लवकरच आयपीएल 2023 स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघात सामील होईल. या हंगामात कोलकाताला त्यांचा पहिला सामना 1 एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध दुपारी 3.30 वाजता खेळायचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com