Sunil Gavaskar: गावसकरांच्या कुटुंबावर पसरली शोककळा; लाईव्ह सामन्यातील समालोचन सोडून अचानक कानपूरला रवाना

Sunil Gavaskar: सुनील गावसकरांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून ते भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान समालोचनाचे काम सोडून कानपूरला रवाना झाले आहेत.
Sunil Gavaskar
Sunil GavaskarDainik Gomantak
Published on
Updated on

Sunil Gavaskar leaves commentary duty during India vs England Test after mother-in-law passed away:

भारत आणि इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमला चालू आहे. शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) चालू झालेल्या या सामन्यात भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर समालोचन करत होते. मात्र, त्यांना अचानक कानपूरला परतावे लागले.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार गावसकरांच्या सासूचे, पुष्पा मल्होत्रा यांचे निधन झाले आहे. त्याचमुळे ते त्यांची पत्नी मार्शनील गावसकर आणि इतर कुटुंबियांसाठी समालोचन सोडून कानपूरला गेले आहेत.

Sunil Gavaskar
Sunil Gavaskar on Pujara: 'लाखो फॉलोवर्स नाही म्हणून…', पुजाराला वगळले अन् गावसकर भडकले

दरम्यान ते काही दिवसांनी पुन्हा समालोचन करण्यासाठी परतू शकतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गावसकरांच्या आईचे, मीना गावसकरांचे 2022 मध्ये वृद्धपकाळाने निधन झाले होते. त्यावेळी देखील गावसकर ढाकामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश कसोटीत समालोचन करत होते.

गावसकरांनी क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेट प्रशासक आणि समालोचन क्षेत्रात पाऊल टाकले. ते काही काळ बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्षही होते. तसेच गेले अनेक वर्षांपासून ते समालोचन करत आहेत.

Sunil Gavaskar
IND vs ENG, Test: जयस्वालच्या द्विशतकानंतर बुमराहच्या 6 विकेट्सने; दुसऱ्या दिवसाखेर भारताकडे 171 धावांची आघाडी

गावसकरांनी त्यांच्या कारकिर्दीत 125 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 51.12 च्या सरासरीने 10122 धावा केल्या आहेत. यामध्ये 34 शतकांचा आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. ते कसोटीत 10 हजार धावा करणारे पहिले फलंदाज आहेत.

तसेच त्यांनी 108 वनडे सामने खेळले असून 35.13 च्या सरासरीमे 1 शतक आणि 27 अर्धशतकांसह 3092 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com