KL Rahul - Athiya Shetty लग्नानंतर सासरा सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया Viral, म्हणाला...

Video: केएल राहुल आणि अथिया शेट्टी याचे लग्न झाले असून सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
KL Rahul - Athiya Shetty | Suniel Shetty
KL Rahul - Athiya Shetty | Suniel ShettyDainik Gomantak

KL Rahul - Athiya Shetty Marriage: भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी सोमवारी (23 जानेवारी) लग्नगाठ बांधली. त्यांचा लग्नसोहळा स्टार अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील आलिशान फार्महाऊसवर पार पडला. याबद्दल स्वत: सुनील शेट्टीने माहिती दिली आहे.

अथिया ही सुनील शेट्टीची मुलगी आहे. त्यामुळे आता सुनील केएल राहुलचा अधिकृतरित्या सासरा बनला असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. सुनीलने लग्न लागल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी तो पारंपारिक वेशात दिसला. त्याने कुर्ता आणि काही दागिने परिधान केले होते.

KL Rahul - Athiya Shetty | Suniel Shetty
Team India: टीम इंडियाचा 'हा' धाकड निवृत्तीनंतर मैदानात परतला, भारतासाठी विश्वचषक...!

त्याने आणि त्याचा मुलगा आहान शेट्टी यांनी केएल राहुल आणि अथियाच्या लग्नानिमित्त फार्महाऊसबाहेर उभ्या असलेल्या पापाराजींना गोड देखील वाटले.

यावेळी सुनीलला लग्नाबद्दल विचारले असता त्याने सांगितले की 'खूप सुंदर लग्न झाले. कुटुंबातील आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा छोट्या स्वरुपातील सोहळा होता. सप्तपदीही झाली आणि अधिकृतरित्या लग्न झाले आहे, तर मी पण अधिकृतरित्या सासरा झालोय.'

तसेच केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाच्या रिसेप्शनबद्दल विचारल्यावर सुनील म्हणाला, 'मला वाटते की आयपीएलनंतर होईल.' तसेच त्याने असेही सांगितले की सासऱ्यापेक्षा त्याला केएल राहुलचा वडील राहायला आवडेल. त्याचबरोबर त्याने सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभारही व्यक्त केले.

KL Rahul - Athiya Shetty | Suniel Shetty
केवळ KL Rahul नाही, तर 'या' 7 क्रिकेटपटूंनीही बांधली अभिनेत्रींशी लग्नगाठ

केएल राहुल आणि अथिया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी गेल्यावर्षी त्यांच्या नात्याची सोशल मीडियावरून कबुली दिली होती. तसेच त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटोही पोस्ट केले होते. त्यानंतर सातत्याने त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा होत होत्या. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, या लग्नसोहळ्यासाठी केएल राहुलने भारतीय संघातून विश्रांती घेतली होती. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नाही.

संगीतादरम्यानचा व्हिडिओ झालेला व्हायरल

दरम्यान केएल राहुल आणि अथियाच्या लग्नातील काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते. त्यांच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ व्हायरलही झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com