केवळ KL Rahul नाही, तर 'या' 7 क्रिकेटपटूंनीही बांधली अभिनेत्रींशी लग्नगाठ

Pranali Kodre

भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्याबरोबर 23 जानेवारीला लग्न करणार आहे.

KL Rahul and Athiya Shetty | Dainik Gomantak

तसे क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे नाते काही नवीन नाही. आजपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूडमध्ये काम केलेल्या अभिनेत्रींशी लग्नगाठ बांधली आहे.

KL Rahul and Athiya Shetty | Dainik Gomantak

यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी डिसेंबर 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते. त्यांना 2 वर्षाची मुलगीही आहे.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्यानेही त्याची आयुष्यभराची साथीदार म्हणून अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक हिला निवडले आहे. या जोडप्याला 2020 मध्ये पुत्ररत्नही प्राप्त झाले असून त्याचे नाव अगस्त्य आहे.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानने 2017 मध्ये 'चक दे इंडिया' फेम सागरिका घाटगेबरोबर लग्न केले आहे. ते लग्नाआधी बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते.

Zaheer Khan and Sagarika Ghatge | Dainik Gomantak

फिरकीपटू हरभजन सिंगने अभिनेत्री गिता बसराबरोबर 2015 साली लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे.

Harbhajan Singh and Geeta Basra | Dainik Gomantak

भारताचा 2011 विश्वविजयाचा नायक युवराज सिंगने 2016 साली 'बॉडीगार्ड' फेम अभिनेत्री हेजल किचबरोबर लग्न केले. त्यांना आता एक मुलगाही आहे.

Yuvraj Singh and Hazel Keech | Dainik Gomantak

भारताचे सर्वात युवा कर्णधार असा विक्रम नावावर असलेल्या मन्सूर अली खान पतौडी उर्फ टायगर पतौडी हे देखील बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत आहेत.

Sharmila Tagore and late Mansur Ali Khan Pataudi | Dainik Gomantak

टायगर पतौडी यांनी 1968 साली अभिनेत्री शर्मिला टागोरबरोबर लग्न केले होते. त्यांची सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान ही मुलं आहेत.

Sharmila Tagore and late Mansur Ali Khan Pataudi | Dainik Gomantak
KL Rahul and Athiya Shetty | Dainik Gomantak