Stuart Broad
Stuart BroadDainik Gomantak

स्टुअर्ट ब्रॉड ने Ashes मध्ये केला नवा रेकॉर्ड, या दिग्गजांना टाकले मागे

अ‍ॅशेसमध्ये (Ashes) सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी महान लेगस्पिनर शेन वॉर्नच्या नावावर आहे.
Published on

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. स्टुअर्ट ब्रॉड हा अ‍ॅशेस मालिकेच्या इतिहासात इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. होबार्ट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची विकेट घेत ब्रॉडने (Stuart Broad) माजी अष्टपैलू इयान बॉथमला मागे टाकले.

दरम्यान, 35 वर्षीय वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकात वॉर्नरला बाद करुन अ‍ॅशेस मालिकेतील 129 वी विकेट घेतली. ब्रॉडने 35 कसोटीत या 129 विकेट घेतल्या. यासह ब्रॉडने महान इंग्लिश अष्टपैलू आणि माजी कर्णधार बोथमचा विक्रम मोडीत काढला. बॉथमच्या नावावर इंग्लंडकडून (England) अ‍ॅशेसमध्ये 128 विकेट्स घेण्याचा विक्रम होता.

Stuart Broad
DRS आणि भारताच्या वादामुळेच आम्ही जिंकलो; कर्णधार डीन एल्गर

त्याचवेळी, ब्रॉडचा साथीदार आणि इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज जेम्स अँडरसन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. अँडरसनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेसमध्ये 112 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या खालोखाल माजी इंग्लिश कर्णधार आणि वेगवान गोलंदाज बॉब विलिस तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 123 बळी घेतले आहेत.

तसे पाहता, अ‍ॅशेसमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी महान लेगस्पिनर शेन वॉर्नच्या (Shane Warne) नावावर आहे. वॉर्नने इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेसमध्ये विक्रमी 195 बळी घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com