DRS आणि भारताच्या वादामुळेच आम्ही जिंकलो; कर्णधार डीन एल्गर

भारतीय संघ ज्यावेळेस डीआरएस वाद घालत होता त्याचवेळेस दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ने कीगन पीटरसन सोबत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला.
Dean Elgar
Dean ElgarDainik Gomantk
Published on
Updated on

केपटाऊन येथील कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. या विजयाबाबत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने मोठा खुलासा केला. भारतीय संघ ज्यावेळेस डीआरएस वाद घालत होता त्याचवेळेस दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ने कीगन पीटरसन सोबत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला.

अंपायर माराईस इरास्मसने फलंदाज डीन एल्गर( Dean Elgar) याला एलबीडब्ल्यू आऊट दिले, परंतु थर्ड अंपायर ने डीआरएस ची मदत घेऊन चेंडू हा स्टंपच्या वरून जात असल्याचे दाखवले. त्यामुळे थर्ड अंपायर ने निर्णय बदलला आणि भारतीय खेळाडू संतापले. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली,(Virat Kohali) उपकर्णधार केएल राहुल आणि गोलंदाज आर अश्विन यांनी थर्ड अंपायर सोबत वाद घातला.

Dean Elgar
Indian Super league: आणखी एक आयएसएल सामना कोविड `बाधित`

पूर्ण भारतीय संघात (Cricket) फक्त डीआरएस ची चर्चा होती. स्टंप जवळ असलेल्या माइकच्या माध्यमातून प्रसारन करत होते. याचवेळेस 212 धावांचे लक्ष असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 200 हून अधिक धावांचे लक्ष्य न्यूलँड्सच्या मैदानावर काढणे कठीण असल्याने त्यांना आव्हानाचा पाठलाग करण्याची संधी मिळाली. मात्र डीआरएसने एल्गरला वाचवले, त्यावेळी संघाची धावसंख्या ही 1 बाद आणि 60 धावा होत्या, मात्र त्यानंतर संघाने 8 षटकांत 40 धावा करत सामना आपल्या ताब्यात घेतला.

सामना 7 विकेटने आणि मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर यजमान संघाचा कर्णधार डीन एल्गर म्हणाला की, "आम्हाला स्पष्टपणे धावा काढण्यासाठी एक छोटीशी खिडकी मिळाली. विशेषत: गुरुवारी आम्हाला थोडे मोकळे होऊन धावा करायच्या होत्या, आणि निश्चितपणे आम्हाला आमचे लक्ष्य साध्य करण्यासाठी असे करणे आवश्यक होते.त्याचवेळी, या वादावर कर्णधार डीन एल्गर म्हणाला, "मला ते आवडले. साहजिकच तो एक संघ होता, ज्यावर दडपण होते. आणि आम्ही खूप आनंदी आहोत. फलंदाजीसह." शेवटच्या डावात आमचे कौशल्य दाखवायचे होते की विकेट देखील गोलंदाजांच्या बाजूने आहे आणि आम्ही ते दाखवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com