Sri Lanka Cricket: ICC ची मोठी कारवाई, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व निलंबित

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील श्रीलंका क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीमुळे बोर्ड आणि श्रीलंकेत गोंधळाचे वातावरण आहे.
Sri Lanka Team
Sri Lanka TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Sri Lanka Cricket Team: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील श्रीलंका क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीमुळे बोर्ड आणि श्रीलंकेत गोंधळाचे वातावरण आहे. श्रीलंकेच्या संसदेने गुरुवारी देशाची क्रिकेट प्रशासकीय संस्था बरखास्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता.

त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा मिळाला होता. यातच आता, आयसीसीने शुक्रवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले. आयसीसीने बैठकीत निर्णय घेतला की, श्रीलंका क्रिकेट बोर्ड एक सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे उल्लंघन करत आहे.

आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट बोर्ड स्वतंत्रपणे आपले कारभार चालवू शकत नाही. सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय श्रीलंकेतील क्रिकेटचे प्रशासन आणि नियमन करण्याची जबाबदारी पार पाडण्यात क्रिकेट बोर्ड अपयशी ठरले आहे. निलंबनाच्या अटी आयसीसी बोर्ड योग्य वेळी ठरवेल.

Sri Lanka Team
World Cup 2023: वर्ल्ड कप फायनलसाठी इम्रान खान यांना ICC चे निमंत्रण; तरीही पाहता येणार नाही सामना, जाणून घ्या कारण

दरम्यान, सोमवारी क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापनाची हकालपट्टी केली आणि माजी विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यांची क्रिकेट बोर्ड चालवण्यासाठी सात सदस्यीय अंतरिम समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.

मात्र, त्यानंतर मंगळवारी अपीलीय न्यायालयाने शम्मी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापनाला पुन्हा बहाल केले.

दुसरीकडे, बंगळुरु येथे झालेल्या अखेरच्या गट सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव केला होता. श्रीलंकेचा संघ विश्वचषकात नऊ पैकी फक्त दोनच सामने जिंकू शकला, ही त्याची आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. भारताविरुद्ध संघ 56 धावांतच ऑलऑऊट झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com