क्रिकेटविश्वात खळबळ! 38 वर्षीय फिरकीपटूला फिक्सिंगच्या आरोपात अटक

Sachithra Senanayake: बुधवारी 38 वर्षीय फिरकीपटूला 2020 मध्ये फिक्सिंगच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
Sachithra Senanayake
Sachithra SenanayakeDainik Gomantak
Published on
Updated on

Sri Lanka spinner Sachithra Senanayake arrested for match-fixing accusations:

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेला बुधवारी (६ सप्टेंबर) मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी त्याने शरणागती पत्करल्यानंतर क्रीडा भ्रष्टाचार अन्वेषण युनिटकडून अटक करण्यात आली. त्याआधी तीन आठवड्यांपूर्वी त्याला देश सोडण्यापासून बंदी घालण्यात आली होती. त्याच्या प्रवासावर कोलंबोतील न्यायालयाने बंदी घातली असून ही तीन महिन्यांसाठी आहे.

Sachithra Senanayake
Ponda News: जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक; फोंडा पोलिसांची कारवाई

३८ वर्षीय सेनानायकेवर साल २०२० मधील लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील दोन सामन्यात फिक्सिंग करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्याने दोन खेळाडूंना फिक्सिंक करण्यासाठी भुलवण्याचा आरोप आहे.

बुधवारी न्यायालयाने निर्देश दिले आहे की क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास युनिटने ऍटर्नी जनरल विभागाला सेनानायकेवरील फौजदारी आरोप निश्चित करावेत.

विशेष गोष्ट अशी सेनानायकेवर यापूर्वी २०१४ मध्येही संशयित गोलंदाजीबद्दल निलंबित केले होते, त्यानंतर त्याने गोलंदाजीत बदल करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.

Sachithra Senanayake
Doping: धक्कादायक! भारताच्या आणखी एका आंतरराष्ट्रीय क्रीडापटूवर डोपिंगमुळे निलंबनाची कारवाई

सेनानायकेने साल २०१२ मध्ये श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १ कसोटी, ४९ वनडे आणि २४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले होते. त्याने कसोटीत एकही विकेट घेतली नाही. पण वनडेत त्याने ५३ विकेट्स घेतल्या.

तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २४ सामने खेळले असून २५ विकेट्स घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अखेरीस २०१६ मध्ये खेळला आहे. त्यानंतर तो २०२२ पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com