श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांनी शुक्रवारी रात्री अखेरच्या एकदिवसीय ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाप्रती भरभरून कृतज्ञता व्यक्त केली. या सामनादरम्यान स्टेडियमवर गर्दी करणारे चाहते "थँक यू ऑस्ट्रेलिया" चे बॅनर घेऊन बाहेर पडल्याने काही क्षण ऑस्ट्रेलियन खेळाडू ही भारावून गेले.( sri lanka economic crisis thank you team australia for visit )
सध्या श्रीलंका मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाशी झुंज देत आहे, आणि क्रिकेट मालिकेने या क्रिकेट वेड्या राष्ट्रातील लोकांच्या चेहऱ्यावर काही क्षण का असेना हसू आणल्याचे चाहत्यांचे म्हणने आहे. त्यामूळे तुमचे खुप खुप आभार आहेत. अशा आशयाचे पोस्टर्स दर्शवले. हा सामना ऑस्ट्रेलियाने 4 विकेटने जिंकला. मात्र पाच सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या संघाला 2-3 असा पराभव पत्करावा लागला आहे. वनडे मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाला यजमानांविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे. कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन मर्यादित षटकांच्या मालिकेतील अनेक खेळाडू मायदेशी परतणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका बोर्डाने पोस्ट केले व्हिडिओ
चाहत्यांचा सपोर्ट व्हिडिओ ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका बोर्डाने त्यांच्या संबंधित सोशल मीडिया अकाउंटवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानावर उभे आहेत आणि मैदानावर येऊन चाहत्यांचे आभार मानत आहेत. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल देखील श्रीलंकन चाहत्यांचा असा पाठिंबा पाहून आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की सहसा आम्हाला शत्रू म्हणून पाहिले जाते. मात्र हे चित्र आम्हांला सकारात्मक उर्जा देणारे आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम यजमान फलंदाजांना 160 धावांवर बाद केले. त्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या सहा विकेट्सच्या मोबदल्यात 164 धावा केल्या होत्या. मालिका आधीच 3-1 अशी जिंकलेल्या श्रीलंकेच्या संघाला बेंच स्ट्रेंथची संधी दिली. संघाने 62 धावांत 7 विकेट गमावल्या. येथून चमिका करुणारत्नेने 75 धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानेही 50 धावांत 4 विकेट गमावल्या, त्यानंतर अॅलेक्स कॅरी (45*) इतर फलंदाजांसह संघाला विजयापर्यंत नेले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.