ICC Cricketer of the Year award 2023:
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून 2023 वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच विविध विभागातील पुरस्कारांसाठी आयसीसीने खेळाडूंना नामांकन दिले होते. आता आयसीसीकडून पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जात आहे.
आयसीसीने गुरुवारी (25 जानेवारी) सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटू आणि कसोटीपटूच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. याबरोबरच सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या रेचल हेहो फ्लिंट पुरस्कार इंग्लंडच्या नतालिया सायव्हर-ब्रंट या खेळाडूला मिळाला आहे. तिने सलग दुसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले आहे.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला जाहीर झाला आहे.
त्याचबरोबर सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार विराट कोहलीला घोषित झाला आहे, तर सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार उस्मान ख्वाजाला देण्यात आला आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवला सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे.
सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू - रचिन रविंद्र (न्यूझीलंड)
सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू - फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)
सर्वोत्तम टी20 पुरुष क्रिकेटपटू - सूर्यकुमार यादव (भारत)
सर्वोत्तम टी20 महिला क्रिकेटपटू - हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज)
सर्वोत्तम वनडे पुरुष क्रिकेटपटू - विराट कोहली (भारत)
सर्वोत्तम वनडे महिला क्रिकेटपटू - चामरी अटापट्टू (श्रीलंका)
सर्वोत्तम कसोटीपटू - उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
सर गॅरी सोबर्स ट्रॉफी (सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 2023) - पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
रेचल हेहो फ्लिंट ट्रॉफी (सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू 2023) - नतालिया सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
सर्वोत्तम पंच - रिचर्ड इलिंगवर्थ
सहसदस्य संघातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू - बास दे लीड (नेदरलँड्स)
सहसदस्य संघातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू - क्विंटर एबेल (केनिया)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.