IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्सने जयदेव उनाडकटच्या रिप्लेसमेंटची केली घोषणा, जाणून घ्या कोण आहे सूर्यांश शेडगे

IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने गुरुवारी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली.
Jaydev Unadkat & Suryansh Shedge
Jaydev Unadkat & Suryansh ShedgeDainik Gomantak

IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने गुरुवारी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली. LSG ने IPL 2023 च्या उर्वरित सामन्यांसाठी सूर्यांश शेडगेला उनाडकटच्या जागी खेळवण्यात येणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान उनाडकटच्या खांद्याला दुखापत झाली होती. सूर्यांश 20 लाख रुपयांमध्ये एलएसजीमध्ये सामील झाला. त्याचे वय फक्त 20 वर्षे आहे.

जाणून घ्या कोण आहे सूर्यांश शेडगे

गेल्या मोसमात मुंबईच्या 17 सदस्यीय रणजी संघात सूर्यांशचा समावेश करण्यात आला होता. 25 वर्षांखालील राज्य अ ट्रॉफीच्या 8 सामन्यात त्याने 184 धावा आणि 12 विकेट घेत आपली प्रतिभा दाखवली होती.

एलएसजीचा नियमित कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) दुखापत झाली त्याच दिवशी उनाडकट जखमी झाला.

Jaydev Unadkat & Suryansh Shedge
IPL 2023 Purple Cap: 64 सामन्यांनंतर पर्पल कॅपचा बादशहा कोण? टॉप 5 मध्ये केवळ 1 विदेशी गोलंदाज

दुसरीकडे, 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या सामन्यादरम्यान आउटफिल्डमध्ये चेंडूचा पाठलाग करताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. लखनऊ सुपर जायंट्स 13 सामन्यांतून 15 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

आतापर्यंत 7 विजय आणि 5 पराभवांसह, त्यांच्या प्लेऑफची शक्यता शनिवारी कोलकाता येथे कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या (Kolkata Knight Riders) महत्त्वपूर्ण विजयावर अवलंबून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com