Goa Sports: आता भरणार गोव्यातील गुरुजींची शाळा; क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले...

चिखलीच्या एसएजी मैदानातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्क्वॅश कोर्ट संकुलाचे उद्घाटन
Goa Sports
Goa SportsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: तांत्रिक व कौशल्य ज्ञानासाठी गोव्यातील विविध प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षित करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली, चिखलीच्या एसएजी मैदानातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्क्वॅश कोर्ट संकुलाचे उद्घाटन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

(Sports Minister Govind Gawde informed Goa coachs will be trained by international coach)

प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षित करताना योग्य प्रशिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच क्रीडा खात्याने गोव्यातील विविध क्रीडापटूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Goa Sports
Team India: सॅमसन-सूर्यकुमारला बांगलादेशविरुद्ध संधी न दिल्याने BCCI वर टीकेची झोड, जातीवादाचाही आरोप

याप्रसंगी पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, चिखली परिसरात जागतिक दर्जाचे क्रिकेट मैदान, फुटबॉल मैदान, क्रिकेट खेळपट्टी, जलतरण तलाव येणाऱ्या काळात सर्वाना पाहण्यास मिळेल. दाबोळी मतदारसंघ क्रीडा क्षेत्र केंद्र बनणार आहे. आम्ही राष्ट्रीय गेम्सचेही आयोजन करणार आहोत. यामुळे क्रीडापटूंना उच्च स्तरावर जाण्याची सुवर्ण संधी मिळेल असे ते म्हणाले.

Goa Sports
Iran beats Wales: इराणचा वेल्सवर थरारक विजय; भरपाई वेळेत शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 2 गोल

या कार्यक्रमास चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, गोवा असोसिएशन ऑफ स्क्वॅशचे अध्यक्ष पंकज जोशी, सचिव कॅप्टन रवी पेरीस, बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, उपसरपंच लॉरोना कुन्हा क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाचे संचालक अजय गावडे, एसएजीच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर आदी मान्यवर ही उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com