फातोर्डा: गोवा ऑलिंपिक असोसिएशन व गोवा क्रिडा प्राधिकरणाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या टोकियो ऑलिंपिक जागृती कार्यक्रमाअंतर्गत मडगाव नगरपालिका आगाखान बागेत गोवन हॉकी असोसिएशनने शिफारस केलेले हॉकी खेळाडू, प्रशिक्षक व प्रवर्तकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गोवन हॉकीचे अध्यक्ष शावियर मार्कुस, सचिव बेनी व्हीएगस तसेच कार्यकारी समिती सदस्य श्रीमती नेली रॉड्रिग्स व नावेली येथील परपेच्युअल सुकोर कॉनवेंट हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिबराडा हे सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित होते. (Sports)
या प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून लिनो डिसोझा, नॉबर्ट फर्नांडिस, फ्रांसिस रेबेलो, ज्योकिना मास्कारेन्हस व क्लिफर्ड फर्नांडिस यांचा समावेश आहे. लिनो डिसोझा हे हॉकीचे प्रवर्तक. त्यांनी 1993 ते 2006 या कालावधीत आंतरशालेय हॉकी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शिवाय महिला हॉकी गोव्यात जिवंत ठेवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. नॉबर्ट फर्नांडिस हे गुडी, पाड्डे येथील दामोदर इंग्लिश हायस्कुलचे मुख्याध्यापक तसेच हॉकी प्रशिक्षक आहेत. त्यानी आपल्या शालेय हॉकी संघाला उच्च स्तरावर नेऊन नेहरु कप हॉकी स्पर्धेतही पात्रता मिळवुन दिली होती.
फ्रांसिस रेबेलो हे माजोर्डा येथील सेंट अँथोनी हायस्कुलचे शारिरिक शिक्षणाचे शिक्षक. त्यांनी आपल्या शालेय संघाला राज्य अजिंक्यपदे मिळवुन दिली. श्रीमती ज्योकिना मास्कारेन्हसन या परपेच्युअल सुकोर कॉनवेंट हायस्कुलच्या शारिरीक शिक्षिका आहेत. हॉकी इंडियातर्फे आयोजित हॉकी प्रशिक्षण लेव्हल 1 परिक्षा उत्तिर्ण होणाऱ्या त्या एकमेव गोमंतकीय आहेत. क्लिफर्ड फर्नांडिस यांची 2004 साली ज्युनियर भारतीय निवड चाचणी शिबिरात निवड झाली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.