Independence Day: स्वातंत्र्यदिन चिरायू होवो! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा, भारतीय खेळाडूंकडून देशवासियांना शुभेच्छा

India Independence Day: भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Independence Day
Independence DayDainik Gomantak
Published on
Updated on

Sports Fraternity Wishes India on 77th Independence Day:

भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले होते. जवळपास दीडशे वर्षे देशावर इंग्रजांनी राज्य केल्यानंतर अखेर भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात यश मिळाले होते. त्याचमुळे दरवर्षी भारतात 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.

यंदा भारत 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. याच निमित्ताने भारताच्या अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. खेळ हा देखील भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचे अंग राहिले आहे. गेल्या ७७ वर्षात खेळातील यशाने अनेकदा भारताचा तिरंगा उंचावर फडकावला आहे.

Independence Day
Independence Day PM Modi Speech: 'मणिपूरमध्ये जेव्हा काही घडते तेव्हा...' जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 7 महत्वाचे मुद्दे

७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतरत्न सचिन तेंडुलकरने शुभेच्छा देताना लिहिले आहे की 'माझे माझ्या देशावर प्रेम आहे. सर्व भारतीयांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा. जय हिंद.'

तसेच विराट कोहलीने लिहिले की 'सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद.'

तसेच बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने ट्वीट करत लिहिले की 'स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. पोडियमवर अनेकवेळा तिरंगा उचवणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती.'

'जन गण मन' चा आवाज मला आनंद देण्यास कधीही कमी पडत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या सुंदर आणि वैविध्यपूर्ण देशाबद्दल असलेल्या अभिमानाची आठवण होते. आपण आपल्या महान देशाला असेच एक एक पाउल पुढे घेऊन जाऊ.'

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर लिहिले की 'इश्क़ है या कुछ और ये पता नहीं मगर जो तुमसे है वो किसी और से नहीं! जय हिंद.'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने लिहिले, 'तिरंग्याचा अर्थ शब्दांपेक्षा जास्त आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.'

भारताच्या हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेसने लिहिले, 'स्वातंत्र्यदिनी राष्ट्राप्रती प्रेम आणि उत्कटतेचा सूर गुंजत राहो. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.'

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रानेही स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या व्यतिरिक्तही अनेक खेळाडूंनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com