SA vs IND: द्विशतक-शतक हुकलं, पण एल्गार-यान्सिन भारताला नडले! द. आफ्रिकेकडे दीडशतकी आघाडी

South Africa vs India: भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने दीडशे धावांची आघाडी घेतली आहे.
Dean Elgar - Rohit Sharma
Dean Elgar - Rohit SharmaPTI
Published on
Updated on

South Africa vs India, 1st Test Match at Centurion:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनला मंगळवारपासून (26 डिसेंबर) सुरु झाला आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध भक्कम आघाडी घेण्यात यश मिळवले आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात 108.4 षटकात 408 धावांवर संपला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 163 धावांची पिछाडी स्विकारावी लागली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पहिल्याच दिवशी क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता.

त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले होते. याच दुखापतीमुळे त्याला फलंदाजीलाही येता आले नाही. त्यामुळे 9 विकेट्स गेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गारने 185 धावा केल्या, तर मार्को यान्सिन 84 धावांवर नाबाद राहिला.

Dean Elgar - Rohit Sharma
SA vs IND: डीन एल्गरचा शतकी जलवा! दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने घेतली आघाडी

या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 66 षटकात 5 बाद 256 धावा केल्या होत्या. त्यावेळी एल्गार 140 धावांवर आणि यान्सिन 3 धावांवर नाबाद होते. या दोघांनी तिसऱ्या दिवशीही दमदार फलंदाजी केली. त्यांनी भारताला सुरुवातीला यश मिळू दिले नाही. त्यामुळे त्यांची शतकी भागीदारीही झाली.

अखेर 95 व्या षटकात एल्गरला शार्दुल ठाकूरने बाद केले. त्यामुळे त्याचे द्विशतक थोडक्यात हुकले. एल्गरने 287 चेंडूत 185 धावा केल्या. त्याच्यात आणि यान्सिन यांच्यात 111 धावांची भागीदारी झाली.

एल्गर बाद झाल्यावर गेराल्ड कोएत्झीने यान्सिनची साथ देण्याचा प्रयत्न केला. पण कोएत्झी 18 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर कागिसो रबाडा 1 धावेवरच बाद झाला.

त्यानंतर एक बाजूने नांद्रे बर्गरने चेंडू खेळून काढत यान्सिनला साथ दिली होती. मात्र बुमराहने बर्गरला बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव संपवला. यान्सिन 147 चेंडूत 84 धावा करून नाबाद राहिला. त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला.

Dean Elgar - Rohit Sharma
SA vs IND: टीम इंडियाच्या कामी आली ब्रॉडची ट्रिक, विराटने लावलं डोकं अन् मग..., पाहा Video

दरम्यान या सामन्यात दुसऱ्या दिवशी डेव्हिड बेंडिंगहॅमनेही दक्षिण आफ्रिकेकडून चांगली कामगिरी केली होती. त्याने 56 धावा केल्या. त्याचबरोबर टोनी डी झोर्झीने एल्गरबरोबर 93 धावांची भागीदारी केली होती. पण झोर्झी 28 धावांवरच बाद झाला होता.

भारताकडून या डावात गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या. याशिवाय शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा आणि आर अश्विनन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी भारताचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com