SA vs IND: डीन एल्गरचा शतकी जलवा! दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने घेतली आघाडी

South Africa vs India: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे.
Dean Elgar
Dean ElgarDainik Gomantak
Published on
Updated on

South Africa vs India: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. भारताने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावून 245 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत 66 षटकांत 5 गडी गमावून 256 धावा केल्या आहेत. तिसऱ्या सत्रात खराब प्रकाशामुळे पुन्हा एकदा खेळ लवकर थांबवावा लागला. डीन एल्गर (140) आणि यान्सेन (3) क्रीजवर आहेत. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या, त्यामुळे दक्षिण आफ्रिका आता 11 धावांनी पुढे आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावाच्या सुरुवातीलाच धक्का बसला. चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने एडन मार्करमला झेलबाद केले. एडनने 17 चेंडूत पाच धावा केल्या. बुमराहने जॉर्जीला बाद केले. टोनी जॉर्जी 28 धावा करुन बाद झाला. कीगन पीटरसनला केवळ दोन धावा करता आल्या. डेव्हिड बेडिंगहॅम अर्धशतकी खेळी खेळून बाद झाला. काइल वॉरेनला केवळ 4 धावा करता आल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Dean Elgar
SA vs IND: केएल राहुल द. आफ्रिकेला एकटा भिडला! सेंच्युरियनवर सेंच्युरी ठोकत केले 'हे' पराक्रम

पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ काहीसा विलंबाने सुरु झाला. दुसऱ्या दिवशी भारताने आठ विकेट्सवर 208 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांनी धावसंख्या 238 धावांपर्यंत नेली. पाच धावा करुन सिराज बाद झाला आणि त्यानंतर केएल राहुलने षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. केएल राहुलची ही खेळी इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाईल, कारण त्याने ज्या पद्धतीने ही खेळी दडपणाखाली खेळली त्यावरुन कळते की केएल राहुल किती संयमी आहे. राहुल 101 धावा करुन नांद्रे बर्गरचा बळी ठरला आणि त्यामुळे भारतीय संघ 245 धावांवर सर्वबाद झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या अशा विकेट पडल्या

पहिली विकेट: एडन मार्करम (5), मोहम्मद सिराज 1-11

दुसरी विकेट: टोनी डी जोर्जी (28), जसप्रीत बुमराह 2-104

तिसरी विकेट: कीगन पीटरसन (2), जसप्रीत बुमराह 3-113

चौथी विकेट: डेव्हिड बेडिंगहॅम (56), मोहम्मद सिराज 4-244

पाचवी विकेट: काइल व्हेरीन (4), प्रसिद्ध कृष्ण 5-249

दरम्यान, या सामन्यात आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने 8 विकेट्सवर 208 धावा केल्या होत्या. यष्टिरक्षक म्हणून पहिली कसोटी खेळणारा केएल राहुल 70 धावांवर नाबाद राहिला होता. कर्णधार रोहित शर्मा (5), यशस्वी जयस्वाल (17), शुभमन गिल (2) 24 धावांच्या आत बाद झाले. श्रेयस अय्यर (31) आणि विराट कोहली (38) यांनाही म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. या कसोटी सामन्यासाठी प्रसिद्ध कृष्णाने टीम इंडियासाठी पदार्पण केले. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा तो 309 वा खेळाडू ठरला. या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने या फॉरमॅटचा नंबर 1 गोलंदाज आर अश्विनला स्थान दिले आहे. रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळाले नाही. नांद्रे बर्गर आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले. या सामन्यात केशव महाराजला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दोन्ही संघांनी वेगवान गोलंदाजांना पेसर्स अनुकूल खेळपट्टीवर उतरवण्याचा निर्णय घेतला.

Dean Elgar
SA vs IND, 1st Test: केएल राहुलची शतकी झुंज, तर रबाडाच्या 5 विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ऑलआऊट

अशा प्रकारे भारताच्या विकेट पडल्या

पहिली विकेट: रोहित शर्मा (5), कागिसो रबाडा, 13-1

दुसरी विकेट: यशस्वी जैस्वाल (17), नांद्रे बर्गर, 23-2

तिसरी विकेट: शुभमन गिल (2), नांद्रे बर्गर, 3-24

चौथी विकेट: श्रेयस अय्यर (31), कागिसो रबाडा, 92/4

पाचवी विकेट: विराट कोहली (38), कागिसो रबाडा, 107/5

सहावी विकेट: रविचंद्रन अश्विन (8), कागिसो रबाडा, 121/6

सातवी विकेट: शार्दुल ठाकूर (24), कागिसो रबाडा, 164/7

आठवी विकेट: जसप्रीत बुमराह (1), मार्को यान्सेन, 191/8

नववी विकेट: मोहम्मद सिराज (5), बाद- जेराल्ड कोएत्झी, 9-238

दहावी विकेट: केएल राहुल (101), नांद्रे बर्गर, 10-245

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com