IPL 2023: आयपीएल 2023 चा हंगाम आता अवघ्या काही दिवसांत सुरु होणार आहे. त्याचे संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. यंदाचा आयपीएल हंगाम 31 मार्चपासून सुरु होणार आहे.
दरम्यान, तयारी सुरु झाली आहे. संघांचे शिबिरही सुरु झाले असून, काही संघांनी आपल्या जर्सी बदलल्या आहेत.
दरम्यान, आयपीएलच्या (IPL) एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जात आहे. ही परंपरा याआधी म्हणजेच 2008 IPL पासून सुरु झाली, जी आजतागायत सुरु आहे.
दुसरीकडे, आयपीएल सुरु होण्यापूर्वी अशाच एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ज्याने आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकली आहे. आम्ही पाकिस्तानी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरबद्दल बोलत आहोत.
सोहेलने 2008 मध्ये आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळताना पर्पल कॅप मिळवली होती.
मात्र, एक वर्षानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर सोहेल तन्वीर आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. पण, जेव्हा जेव्हा पर्पल कॅप विजेत्याचे नाव काढले जाते, तेव्हा त्याचे नाव आधी घेतले जाते.
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2008 चे विजेतेपद जिंकले, ज्यामध्ये त्याने देखील चांगले योगदान दिले होते.
सोहेल तन्वीरने मंगळवारी त्याच्या सोशल मीडियाद्वारे जाहीर केले की, तो आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा करत आहे.
त्याने लिहिले की, 'मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. मात्र, देशांतर्गत आणि फ्रेंचायझी क्रिकेट खेळत राहीन. मला माझ्या देशासाठी खेळण्याची संधी दिल्याबद्दल पीसीबीचे आभार.'
तसेच, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने 2007 मध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांमध्ये 71 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 54 विकेट्स घेतल्या आहेत.
2009 मध्ये पाकिस्तानने टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा सोहेल तन्वीरचाही त्या संघात समावेश होता. सोहेल तन्वीरची बॉलिंग अॅक्शन हटके होती, त्यामुळेच तो याबद्दल खूप बोलायचा.
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील आयपीएलमध्ये सोहेल तन्वीरही राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता, ज्याने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते.
त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 11 सामन्यात 22 विकेट घेतल्या. हा एकमेव हंगाम होता, ज्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळताना दिसले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.