Shubman Gill बाबत नवीन अपडेट, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी गूड न्यूज!

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

भारताचा विस्फोटक सलामीवीर शुभमन गिल याला डेंग्यूच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चाहत्यांसाठी आणि टीम इंडियासाठी ही आनंदाची बाब आहे. आज गिलला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करु शकतो.

गिल पाकिस्तानविरुद्ध पुनरागमन करणार का?

दरम्यान, भारतविरुद्ध अफगाणिस्तान सामना उद्या (11 ऑक्टोबर) होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना जिंकून भारत अफगाणिस्तानला शिकस्त देणार आहे.

तर दुसरीकडे, अफगाणिस्तानला पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. गिल आणि रोहित ही जोडी विश्वचषकात चमक दाखवण्यासाठी सज्ज झाली होती, पण भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आणि तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकला नाही.

गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सहभागी होणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. पण गिलला रुग्णालयातून (Hospital) डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो 14 फेब्रुवारीला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करु शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Shubman Gill
World Cup 2023: वनडे वर्ल्ड कपमध्ये अनोखा रेकॉर्ड, नेदरलँड्सविरुद्ध न्यूझीलंड संघाची शानदार कामगिरी

गिलच्या पुनरागमनाने टीम इंडियाला बळ मिळेल

शुभमन गिलबाबत संघ व्यवस्थापकाला आशा आहे की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी गिल पूर्णपणे बरा होईल. अशा स्थितीत गिल विश्वचषकातील सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात खेळताना दिसू शकतो.

गिलच्या पुनरागमनामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची (Team India) बॅटिंग लाइनअप मजबूत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com