Shoaib Malik's wife Sana Javed reacted to chants of ‘Sania Mirza’ during PSL Match at Multan Video Viral:
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने भारतीय माजी टेनिसपटू सानिया मिर्झापासून वेगळे झाल्यानंतर जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न केले आहे. सना ही शोएबची तिसरी पत्नी आहे.
दरम्यान, सना आणि शोएबचे लग्न अनेक भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांच्या मात्र पसंतीस पडलेले नाही. नुकतेच यामुळे सनाला ट्रोलिंगलाही समोरे जावे लागले आहे.
सध्या पाकिस्तान सुपर लीग सुरू असून या स्पर्धेत झालेल्या कराची किंग्स आणि मुलतान सुलतान्स संघात झालेल्या सामन्यासाठी सनानेही हजेरी लावली होती.
मुलतानला झालेल्या या सामन्यादरम्यान सनाला पाहाताच चाहत्यांनी सानिया मिर्झाच्या नावाने घोषणा दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की सामना पाहायला आलेले प्रेक्षकांनी सना दिसताच सानियाचे नाव घेणे सुरू केले, तसेच त्यावेळी तिला कॅमेऱ्यातही टिपले.
यामध्ये दिसते की जेव्हा प्रेक्षकांकडून सानियाचे नाव घेतले जात होते, तेव्हा ती एक कटाक्ष प्रेक्षकांकडे टाकते आणि मग दुर्लक्ष करत पुढे जाते. ती या सामन्यादरम्यान व्हीआयपी बॉक्समध्ये आपला पती शोएबला प्रोत्साहन देण्यासाठी बसली होती. मात्र, तिला तिथेही ट्रॉलिंगचा सामना करावा लागल्याचे या व्हायरल व्हिडिओमधून दिसून येत आहे.
दरम्यान, अनेक चाहत्यांकडून सना ट्रोल होत असाताना तिच्या काही चाहत्यांनी तिच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत.
सना आणि शोएब यांनी जानेवारीमध्ये लग्न करत सर्वांना चकीत केले होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या लग्नाबद्दल सर्वांना माहिती दिली होती. यानंतर सानियाच्या कुटुंबाने स्पष्ट केले होते की शोएबपासून सानिया अनेक महिन्यांपूर्वीच वेगळी झाली होती.
शोएब आणि सानिया यांचे 2010 मध्ये लग्न झाले होते. त्यांना इझहान नावाचा मुलगा देखील आहे. पण त्यांचे हे लग्न जवळपास 14 वर्षांचा संसार केल्यानंतर मोडले. यानंतर शोएबने सनाबरोबर लग्न केले आहे. सनाचेही हे दुसरे लग्न आहे. तिचाही पहिला लग्नानंतर घटस्पोट झाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.