Team India: टीम इंडियाने मॅच फिक्सिंग केली का? शोएब अख्तरला आला मेसेज, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Asia Cup 2023 Super-4 Match: आशिया कपच्या सुपर-4मध्ये टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Asia Cup 2023 Super-4 Match: आशिया कपच्या सुपर-4मध्ये टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. पण दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी काही खास नव्हती. भारताने हा सामना गमावला असता तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडू शकला असता.

आता या सामन्याबाबत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

शोएब अख्तरने धक्कादायक वक्तव्य केलं आहे

भारत (India) आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना 12 सप्टेंबर रोजी खेळला गेला होता. शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) हा व्हायरल व्हिडिओ याच सामन्यातील आहे.

भारताचा डाव संपल्यानंतर सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगबाबतचे मीम्स मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दावा केला आहे की, असे मीम्स त्यालाही पाठवण्यात आले होते. मात्र, हा पूर्णपणे चुकीचा आरोप असल्याचे अख्तरने व्हिडिओद्वारे सांगितले.

Team India
Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज आशिया कपमधून बाहेर!

टीम इंडियाने मॅच फिक्सिंग केलं का?

शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) मीम्स पाठवणाऱ्यांना फटकारले आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, 'मला माहित नाही तुम्ही लोक काय करत आहात.

मला मीम्स आणि मेसेज येत आहेत की भारताने मॅच फिक्स केली आहे. पाकिस्तानला आशिया कपमधून बाहेर काढण्यासाठी टीम इंडिया जाणीवपूर्वक हरत आहे. तुम्ही ठीक आहात का? ते चांगली गोलंदाजी करत आहेत.

वेलालागे आणि असलंका यांनी शानदार गोलंदाजी केली. तुम्ही तो 20 वर्षांचा मुलगा पाहिला का? त्याने धावाही केल्या. मला भारत आणि इतर देशांतून फोन येत आहेत की ते मुद्दाम हरत आहेत.

Team India
Asia Cup 2023: सासरेबुवांनी केलं जावयाचं कौतुक, सुनिल शेट्टीची केएल राहुलला शाबासकीची थाप, अनुष्काही विराटवर खुश

अख्तर पुढे म्हणाला, 'तो का हरेल, मला सांगा? त्याला अंतिम फेरीत जायचे आहे. तुम्ही विनाकारण मीम्स बनवत आहात. भारताकडून चांगली लढत झाली. कुलदीपने शानदार गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराहकडे पाहा, छोटी टोटल असताना त्यांनी केलेली फाइट पाहा...'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Team India World Record
BCCI Refuses Trophy From Mohsin Naqvi
Mohsin Naqvi Trophy Chor Viral Video Dubai
India vs Pakistan women’s Asia cup 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com