शिखर धवनला भारतीय संघात संधी नाही; दिनेश कार्तिक संघात असेल तर...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी शिखर धवनला भारतीय संघात संधी मिळालेली नाहीये.
Shikhar Dhawan
Shikhar DhawanDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी-20 मालिकेसाठी शिखर धवनला (Shikhar Dhawan) भारतीय संघात संधी मिळालेली नाहीये. धवनने 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर या अनुभवी फलंदाजापेक्षा इशान किशनला टीममध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये धवन उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, तरीही त्याची संघात निवड करण्यात आली नाही. (Shikhar Dhawan has no chance in the Indian team)

Shikhar Dhawan
मुंबईच्या रणजी संघाला मोठा झटका, शिवम दुबे संघाबाहेर

आता टीम इंडियाचा (Team India) माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) धवनची निवड न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. जर कार्तिक वयाच्या 37 व्या वर्षी संघात स्थान मिळवू शकला तर धवनही स्थान मिळण्यास पात्र आहे, असे रैनाचे वयक्तिक मत आहे. धवनने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किमान तीन ते चार वर्षे राहिले आहेत आणि जर त्याला पुन्हा संधी मिळाली तर तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगला खेळेल.

धवन खूप दुःखी असेल: रैना

रैनाने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, 'साहजिकच शिखर निराश झाला असेल. प्रत्येक कर्णधाराला संघात स्वतःसारखाच खेळाडू हवा असतो. तो एक मजेदार माणूस आहे जो टीममधील वातावरण चांगले ठेवतो आणि नेहमी धावा करत असतो मग ते देशांतर्गत असो अथवा टी-20 किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये असो. जर तुम्ही दिनेश कार्तिकला संघात परत आणले असेल तर शिखर धवनलाही संघात स्थान मिळायला हवे. गेल्या 3-4 वर्षांपासून त्याने सातत्याने संघासाठी धावा केल्या आहेत.

शिखर धवन हा IPL 2022 च्या लिलावात खरेदी करण्यात आलेला पहिला खेळाडू होता. धवनला पंजाब किंग्जने मेगा लिलावात 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. धवन, डावखुरा सलामीवीर, आयपीएलच्या मागील तीन हंगामात धवन दिल्ली कॅपिटल्सचा (DC) भाग होता. आयपीएल 2022 मध्ये धवनने 14 सामन्यांमध्ये 38.33 च्या सरासरीने 460 रन्स केल्या आहेत. यादरम्यान धवनने तीन अर्धशतके ठोकली आहेत आणि नाबाद 88 ही त्याची सर्वोत्तम रन्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com